Join us

KGF 2 नंतर आता RRR सिनेमाही ऑनलाईन बघता येणार, जाणून कधी आणि कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 12:36 PM

RRR on OTT : RRR को OTT प्लॅटफॉर्म ZEE 5 आणि Netflix पर रिलीज केला जाणार आहे. हा सिनेमा ओटीटीवर बघण्यासाठी अनेक यूजर्सने ट्विटरवर प्रश्न विचारले होते.

राम चरण (Ram Charan), ज्यूनिअर एनटीआर (Jr NTR), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगन (Ajay Devgn) स्टारर एसएस राजामौली यांचा आरआरआर (RRR movie) सिनेमा थिएटरमध्ये धमाका केल्यावर आता ओटीटीवर ऑनलाईन बघता येणार आहे. ज्यांनी थिएटरमध्ये हा सिनेमा पाहिला नाही ते आता मोबाइल किंवा लॅपटॉपवर हा सिनेमा बघू शकणार आहेत. 

RRR को OTT प्लॅटफॉर्म ZEE 5 आणि Netflix पर रिलीज केला जाणार आहे. हा सिनेमा ओटीटीवर बघण्यासाठी अनेक यूजर्सने ट्विटरवर प्रश्न विचारले होते. रिपोर्ट्सनुसार, Zee5 आणि Netflix ने सिनेमाचे डिजिटल डिस्ट्रीब्यूशनचे राइट्स खरेदी केले आहेत. ज्यात Netflix वर हिंदी डब व्हर्जन आणि Zee5 तमिल, तेलुगु आणि मल्याळम वर्जन रिलीज होणार.

कधी बघायला मिळणार?

आतापर्यंत कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मने त्यांच्याकडून अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समजलं की, २५ मे ते जूनच्या सुरूवातीला हा सिनेमा ओटीटीवर बघता येणार आहे. सिनेमा ऑनलाईन रिलीज करण्याची सर्वात मोठी शक्यता ३ जून २०२२ ला आहे. पण ओटीटी प्लॅटफॉर्मकडून अधिकृतपणे घोषणा होण्याची वाट बघावी लागेल.

किती रूपयात घेतले राइट्स

सामान्यपणे थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ७५ ते ९० दिवसात सिनेमा ऑनलाईन स्ट्रीमिंग करण्याची परवानगी असते. असं सांगितलं जात आहे की, e Network ने आरआरआरचे डिजिटल आणि सॅटेलाइट अधिकार 300 कोटी रूपयांना खरेदी केलेत.

टॅग्स :आरआरआर सिनेमाबॉलिवूड