Join us

Saaho Box Office Collection: साहो या चित्रपटाने केली दमदार कमाई, आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 7:10 PM

साहो हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.

ठळक मुद्देचित्रपटाने ओपनिंग विकेंडला खूप चांगला व्यवसाय केला असून शुक्रवारी २४.४० कोटी, शनिवारी २५.२० कोटी आणि रविवारी २९.४८ इतके कलेक्शन केले असून आतापर्यंत हिंदी भाषेत या चित्रपटाने ७९.०८ इतका गल्ला जमवला आहे. 

प्रभासच्या बाहुबली या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात खूप चांगली कमाई केली आहे. या चित्रपटामुळे प्रभासला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर प्रभास प्रेक्षकांना बॉलिवूडमध्ये पाहायला मिळणार असल्याने त्याच्या साहो या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन काहीच दिवस झाले असले तरी या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

साहो हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामीळ अशा तीन विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवसांत ६८ कोटीचा गल्ला जमवला होता... केवळ हिंदी भाषेत या चित्रपटाने २४.४० कोटींचे कलेक्शन केले होते. आता तर या चित्रपटाने १०० करोडच्या क्लबमध्ये एंट्री घेतली असून या चित्रपटाने जगभरात १०४ कोटी रुपये कमावले आहेत तर हिंदी भाषेत आतापर्यंत ७९.८ कोटीचा गल्ला जमवला आहे. २०१९ मध्ये रविवारी सगळ्यात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला असून या चित्रपटाने कबीर सिंग, मिशन मंगल, भारत या चित्रपटाला देखील मागे टाकले आहे. या चित्रपटाने केवळ रविवारी २९-३० कोटीचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटाची घौडदोड अशीच सुरू राहिली तर हा चित्रपट लवकरच २०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करेल अशी आशा वर्तवली जात आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्वीट करून या चित्रपटाच्या कलेक्शबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, चित्रपटाने ओपनिंग विकेंडला खूप चांगला व्यवसाय केला असून शुक्रवारी २४.४० कोटी, शनिवारी २५.२० कोटी आणि रविवारी २९.४८ इतके कलेक्शन केले असून आतापर्यंत हिंदी भाषेत या चित्रपटाने ७९.०८ इतका गल्ला जमवला आहे. 

 

साहो या चित्रपटात प्रभाससोबतच नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, अर्जुन विजय, एवलिन शर्मा, टीनू आनंद यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आधी हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार होता. पण नंतर ही रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. 2 तास 51 मिनिटांच्या या चित्रपटात प्रभास जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. साहोला समीक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या नसल्या तरी सोशल मीडियावर या चित्रपटाचे खूपच चांगले रिव्ह्यू पाहायला मिळत आहेत.