सॅक्रेड गेम्सचा सीझन 2 मधल्या सर्वाधिक लोकप्रिय ठरलीय. या वेबसीरिजच्या भूमिका आणि त्यांचे संवादसुध्दा लोकांच्या पसंतीस पडले. सरताज सिंग आणि गणेश गायतोंडे ह्या दोन भूमिकांसोबतच सॅक्रेड गेम्सच्या पहिल्या आणि दुस-या पर्वातल्या इतरही भूमिकांना आणि त्या निभावणा-या कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
अमेरिका स्थित मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेंड्स इंडियाने सॅक्रेड गेम्सच्या अभिनेत्यांच्या लोकप्रियतेची एक लिस्ट नुकतीच काढली आहे. त्यानुसार, सरताजच्या भूमिकेत दिसलेल्या सैफ अली खानच्या लोकप्रियतेत सॅक्रेड गेम्सचे दुसरे पर्व रिलीज झाल्यानंतरच्या आठवड्यात (15 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट) 78 गुणांवरून 100 गुणांपर्यंत वाढ झालेली दिसून आलीय. ज्यामुळे सैफ अली खान लोकप्रियतेत प्रथम क्रमांकावर आहे. गणेश गायतोंडे बनलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीचीही लोकप्रियता 55 गुणांवरून 59 गुणांपर्यंत पोहोचलीय. ज्यामुळे नवाज लोकप्रियतेत दुस-या क्रमांकावर पोहोचलाय.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “पहिल्या सहा अभिनेत्यांच्या लोकप्रियतेत सॅक्रेड गेम्सच्या रिलीजच्या सुमारास चांगलीच वाढ झालेली दिसून आलीय. सॅक्रेड गेम्सच्या पहल्या सिझननंतर दूस-या सिझनची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यामुळेच ऑगस्ट महिन्यात ह्या कलाकारांच्या लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून आलीय. सोशल, व्हायरल न्यूज़, डिजिटल न्यूज़ आणि न्यूजपेपर्समध्ये ह्या कलाकारांची चांगलीच फॅन फॉलोविंग दिसून आलीय.”