'सडक 2' सिनेमातील सहाय्यक अभिनेत्री क्रिसन परेरा (Chrisann Pareira) ची ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मोठी बातमी समोर येत आहे. काल रात्री क्रिसन परेराची शारजाह जेलमधून सुटका झाली असून ती आज मुंबईत पोहोचली आहे. UAE च्या अधिकाऱ्यांनी तिला ड्रग्ज तस्करी प्रकरणातील सर्व आरोपांतून मुक्त केलं आहे. क्रिसन आज मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचीही भेट घेणार आहेत.
ड्रग्स तस्करी प्रकरणात ती अडकली होती. जशीजशी प्रकरणाची चौकशी झाली तेव्हा तिला शेजाऱ्यांनीच फसवलं असल्याचं उघड झालं होतं. तिला या प्रकरणाची काहीच कल्पना नव्हती हे समोर आलं आणि तिची सुटका झाली. जुन्या भांडण्याचा बदला घेण्यासाठी क्रिसनला ड्रग तस्करी प्रकरणात अडकण्यात आलं. यानंतर मुंबई पोलिसांनी तिला या प्रकरणात गोवणाऱ्या फसवणारे मुंबईचे रहिवासी एंथनी पॉल आणि राजेश बुवतला अटक करण्यात आली आहे. पॉल याचे मालाडमध्ये बेकरी शॉप आहे. तर राजेश बँकेत सहायक प्रबंधक आहे.
गेल्या महिन्यात शारजाहच्या अधिकाऱ्यांनी परेरा कुटुंबीयांना कळवले होते की क्रिशनचा पासपोर्ट भारतात परतण्याबाबत निर्णय घेण्यासाठी समितीकडे पाठवण्यात आला आहे. ट्रॅव्हल ब्लॅकलिस्टमधून त्यांचे नाव वगळण्याबाबत समिती आढावा घेत होती. , शारजाहच्या न्यायालयाने तिला क्लीन चिट दिली.
का आहे प्रकरण?क्रिसनची आई प्रेमिला परेरा यांनी सांगितले, “क्रिसन इंटरनॅशनल वेब सीरिज करण्यासाठी तयार आहे का?” असं विचारलं होतं. त्यानंतर दुबईला ऑडिशन देण्यासाठी क्रिसनसाठी जाण्यास सांगण्यात आलं होतं. १ एप्रिलला क्रिसन दुबईसाठी निघण्याच्या पूर्वी त्या व्यक्तीने तिला मुंबई विमानतळापासून १० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका कॉफी शॉपमध्ये भेटण्यासाठी बोलवलं होतं. त्या व्यक्तीने क्रिसनला एक ट्रॉफी देत ती ऑडिशनसाठी महत्त्वाची असल्याचं सांगितलं. अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी क्रिसन परेराला शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आणि नंतर शारजा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले होते.