झहीरसोबत विवाहबंधनात अडकली सागरिका घाटगे,समोर आले लग्नाचे नवीन PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 4:07 PM
विराट -अनुष्का या जोडीचे प्रेम आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. अगदी त्याच प्रमाणे सागरीका घाटगे आणि झहीर खान या ...
विराट -अनुष्का या जोडीचे प्रेम आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. अगदी त्याच प्रमाणे सागरीका घाटगे आणि झहीर खान या लव्हबर्डचेही प्रेम लपून राहिलेले नाही. विराट-अनुष्काप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून सागरिका आणि झहीर यांच्या लग्नाची सा-यांनाच उत्सुकता होती आणि अखेर तो दिवस आला आणि त्यांच्या चाहत्यांना खुशखबर मिळाली.अभिनेत्री सागरीका घाटगे आणि झहीर खान या दोघांनी अाज त्यांच्या चाहत्यांना एक गुड न्युज दिली आहे ती म्हणजे सागरिका आणि झहीर यांनी आज कोर्ट मॅरेज केले आहे. दोघांनाही कोर्ट मॅरेज करावे अशी इच्छा होती.अगदी त्याचप्रमाणे या दोघांनी विवाह केला असून त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसे पाहिले तर हा विवाह त्यांच्या चाहत्यांसाठी अनपेक्षित होता. या विवाहादरम्यान झहीर खानचा जवळचा मित्र आशिष नेहरा आणि अंजना शर्मा हे दोघे उपस्थित होते. सोशल मीडियावर शेअर झालेले सागरिका आणि झहीरच्या फोटोमध्ये सागरीका फारच सुंदर दिसत आहे.मोठ्या थाटामाटात हा सोहळा पार पडला नसला तरीही मुंबईत सागरिका आणि झहीर 27 नोव्हेंबर रोजी पारंपारीक पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत.मुंबईतच एका ग्रॅण्ड रिसेप्शनचे आयोजनही करण्यात आले आहे. हे रिसेप्शन मुंबईतील कुलाबा येथील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. यासाठी दोघांच्या गेस्टला आमंत्रित करण्यात आले आहे. सागरिका आणि झहीरची ओळख त्याच्या एका कॉमन फ्रेंडने करुन दिली होती. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि दोघे एकमेकांना जवळपास एक दीड वर्ष डेट करत होते.याच वर्षी मे महिन्यात सागरीका आणि झहीर यांनी साखरपुडा केला होता.खरपुडा झाल्याची माहिती झहीरने ट्विटरवरुन दिली होती.''बायकोच्या चॉईसवर कधीही हसू नका.तुम्हीही तिचीच चॉईस असता. पार्टनरर्स फॉर लाईफ असे त्यांनी ट्वीट केले होते''ट्वीटसोबत झहीरने साखरपुड्याचा एक फोटोसुद्धा शेअर केला होता. मुळात युवराज आणि हेजलच्या लग्न समारंभात झहीर आणि सागरिका एकत्र आले होते. यानंतर त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चेला उधाण आले होते. अखेर या चर्चांचा झहीरने पूर्णविराम देता दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे उघडपणे कबुली दिली होती.