Join us

'रामायण'मधील सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने खरंच नॉनव्हेज सोडलं? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 12:43 IST

सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने मासांहार सोडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता खुद्द अभिनेत्रीनेच प्रतिक्रिया देत ट्वीट केलं आहे. 

नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी रणबीर आणि साई पल्लवी मेहनत घेत आहेत. सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने मासांहार सोडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता खुद्द अभिनेत्रीनेच प्रतिक्रिया देत ट्वीट केलं आहे. 

साई पल्लवी काय म्हणाली? 

बऱ्याचदा खरं तर नेहमीच मी शांत राहते. जेव्हा अनेक अफवा, खोट्या गोष्टी कोणत्याही उद्दिष्टाशिवाय पसरवल्या जातात. पण, आता सारख्या सारख्या या गोष्टी पसरवल्या जात असल्याने शांत राहून चालणार नाही. खास करून, जेव्हा माझा सिनेमा प्रदर्शित होणार असेल किंवा नव्या सिनेमाची घोषणा होत असेल, तेव्हाच या गोष्टी होतात. पुन्हा कोणत्याही मीडिया पेजवरुन किंवा व्यक्तीने अशाप्रकारे अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाईने उत्तर दिलं जाईल. 

साई पल्लवीने एका तामिळ वृत्तपत्रातील बातमीचा फोटो पोस्ट करत हे ट्वीट केलं आहे. यामध्ये साई पल्लवीने सीता मातेच्या भूमिकेसाठी मांसाहार सोडल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सध्या ती फक्त शाकाहारी जेवणच जेवत असल्याचं म्हटलं गेलं आहे. खरं तर साई पल्लवी मांसाहार करत नाही. ती शाकाहारी आहे. याबाबत तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

दरम्यान, नितेश तिवारींचं दिग्दर्शन असलेला रामायण सिनेमा २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात रणबीर कपूर रामाची भूमिका साकारणार आहे. तर सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत आहे. त्याबरोबरच केजीएफ स्टार यश रावणाची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

टॅग्स :साई पल्लवीरामायणसेलिब्रिटी