गेल्या काही दिवसांपासून सीतेच्या भूमिकेबाबत सतत चर्चा ऐकायला मिळते आहे. पहिले असे वृत्त समोर आले होते की, सीतेची भूमिका साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) साकारणार आहे. त्यानंतर नुकतेच असे वृत्त समोर आले होते की, निर्मात्यांनी या भूमिकेसाठी जान्हवी कपूर (Janhavi Kapoor)ला विचारलं आहे.
दिग्दर्शक नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांचा 'रामायण' (Ramayana) सिनेमा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दल आणि यातील स्टारकास्टबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीतेच्या भूमिकेबाबत सतत चर्चा ऐकायला मिळते आहे. पहिले असे वृत्त समोर आले होते की, सीतेची भूमिका साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) साकारणार आहे. त्यानंतर नुकतेच असे वृत्त समोर आले होते की, निर्मात्यांनी या भूमिकेसाठी जान्हवी कपूर (Janhavi Kapoor)ला विचारलं आहे. मात्र आता बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सीताच्या रोलसाठी साई पल्लवीच्याच नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रामायणमध्ये श्रीरामाच्या भूमिकेत अभिनेता रणबीर कपूर दिसणार आहे. तर हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलला तर रावणाच्या भूमिकेसाठी केजीएफ फेम यश दिसणार आहे. एप्रिलमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्री प्रोडक्शनचे काम सुरू आहे.
जान्हवी कपूरची नाही 'रामायण'मध्ये वर्णी जान्हवी कपूरला सीतेच्या भूमिकेसाठी विचारले असल्याच्या वृत्ताचे निर्मात्यांनी खंडन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ही निव्वळ अफवा आहे. आमच्या टीमला सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवी आणि आलिया भट या दोघींपैकी एकीची निवड करणार होते. मात्र निर्मात्यांनी साई पल्लवीची या भूमिकेसाठी निवड केली आहे.
२०२५मध्ये येईल भेटीलारिपोर्ट्सनुसार, रामायणचा पहिला भाग २०२५ मध्ये दिवाळीदरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्माते दोन भागात हा चित्रपट बनवण्याचा विचार करत आहेत. ते रामायणची पूर्ण कथा दोन भागात सविस्तररित्या दाखवू इच्छितात. दिग्दर्शक नितेश तिवारी रामायणचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात राम, सीता, हनुमान आणि रावण हे पात्र आणि कलाकार यांची निवड झाली आहे. आता बाकीच्या पात्रांसाठी कलाकारांची निवड प्रक्रिया सुरू आहे.
विजय सेतुपती साकारू शकतो ही भूमिकापिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटासंदर्भात दिग्दर्शकाने विजय सेतुपतीची भेट घेतली आहे. त्यांनी विजयला रावणाचा भाऊ विभिषणाच्या भूमिकेसाठी विचारले आहे. दिग्दर्शकाच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, विजयला स्क्रीप्ट आणि नरेशनने इंप्रेस झाला आहे. अभिनेत्याने चित्रपटासाठी इंटरेस्टही दाखवला आहे. मात्र अद्याप त्याने सिनेमा साइन केलेला नाही. तो टीमसोबत लॉजिस्टिक्स आणि फायनान्ससंदर्भात चर्चा करतो आहे.
शूटिंगला एप्रिलपासून होणार सुरूवातया चित्रपटाच्या मुख्य कलाकारांचे शूटिंग एप्रिलपासून सुरू होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रावणाची भूमिका साकारणारा यश जून किंवा जुलैपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तो १५ दिवसांत त्याच्या व्यक्तिरेखेचे पूर्णपणे चित्रीकरण करेल. रामायणाच्या पहिल्या भागाचे शूटिंग जुलैपर्यंत पूर्ण होईल. या चित्रपटाच्या पोस्ट-प्रॉडक्शनसाठी निर्मात्यांनी दीड वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे.