Join us

'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 5:15 PM

९ वर्षांनंतर सईने 'हंटर' वर भाष्य केलं आहे.

सई ताम्हणकर (Saie Tamhankar) मराठी आणि आता हिंदी सिनेसृष्टीतही आघाडीची अभिनेत्री. सईने सुरुवातीपासूनच विविधांगी भूमिका केल्या. मग ती दुनियादारी मधली स्टायलिश सई असो किंवा हंटर मधील बोल्ड सई. हंटर सिनेमामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.  यामध्ये तिने बोल्ड सीन्स दिले होते. आात इतक्या वर्षांनी तिने हंटर मधील सीन्सवर मित्रपरिवाराची काय प्रतिक्रिया होती हे सांगितले.  

2015 साली 'हंटर' सिनेमा रिलीज झाला होता. आता ९ वर्षांनी सई ताम्हणकरने सिनेमावर भाष्य केलं. 'मिस मालिनी'ला दिलेल्या मुलाखतीत सई म्हणाली, "हंटर असा सिनेमा होता जो काळाच्या खूप पुढे होता. नंतर हा कल्ट सिनेमा म्हणून नावारुपाला येईल अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती. मी हिमाचल प्रदेशला गेले होते. तिथे दोन पंजाबी मुलं मला भेटले. त्यांनी मला विचारलं की मी तीच हंटरमधली आहे का? ते ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला होता. मी सिनेमात जे केलं ते माझ्या मित्रपरिवाराला, कुटुंबाला पचवणं काही प्रमाणात अवघड होतं. पण नंतर काही वर्षांनी आता त्यांना त्या सीन्सबाबत फार काहीच वाटत नाही. कारण जसं मी म्हटलं की तो सिनेमा त्या काळाच्या खूप पुढचा होता. मला हंटरमधल्या फोटोंवर आजही खूप कमेंट्स येतात. काही कमेंट्स खूपच मजेशीर असतात, काही मला फार आवडतात. काही मी रिपोस्ट सुद्धा करते."

सई ताम्हणकरने 'हंटर' सिनेमात ज्योत्स्ना ही विवाहित महिलेची भूमिका केली होती. तिचे वयाने लहान असणाऱ्या मुलासोबत विवाहबाह्य संबंध असतात. यामध्ये तिने गुलशन देवैय्यासोबत सीन्स दिले होते. शिवाय सिनेमात राधिका आपटे, सागर देशमुख, वीरा सक्सेना, वैभव तत्ववादी यांचीही भूमिका होती.

 

टॅग्स :सई ताम्हणकरबॉलिवूडमराठी अभिनेता