Join us

गुलाबी साडी नेसून ट्रेलर लाँचला पोहोचली सई, इमरान हाश्मीसोबत दिली पोज; सिनेमाचं नाव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 14:59 IST

गुलाबी साडी नेसून सई ट्रेलर लाँच सोहळ्याला पोहोचली. या लूकमध्ये ती अगदीच सुंदर दिसत आहे.

अभिनेता इमरान हाश्मीचा (Emraan Hashmi) आगामी 'ग्राऊंड झिरो' सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. आज सिनेमाचा ट्रेलर लाँच पार पडला. यावेळी सिनेमातील सर्व स्टारकास्ट हजर होती. सिनेमात इमरान हाश्मीच्या पत्नीच्या भूमिकेत सई ताम्हणकर (Saie Tamhankar) झळकणार आहे. पहिल्यांदाच इमरान आणि सईची जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. गुलाबी साडी नेसून सई ट्रेलर लाँच सोहळ्याला पोहोचली. या लूकमध्ये ती अगदीच सुंदर दिसत आहे.

'ग्राऊंड झिरो' सिनेमाच्या ट्रेलर लाँचमधील सई ताम्हणकरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गुलाबी साडी, त्यावर सुंदर नक्षीकाम, गुलाबी बॅकलेस ब्लाऊज, लांब केस या लूकमध्ये सई प्रचंड सुंदर दिसत आहे. ट्रेलर लाँचसाठी तिने केलेला हा लूक पाहून चाहते तिच्यावर फिदाच झालेत. तसंच इमरान हाश्मीसोबत ती नंतर पोज देतानाही दिसत आहे. 

'ग्राऊंड झिरो'मध्ये इमरान हाश्मी बीएसएफ जवान नरेंद्र दुबे यांची  भूमिका साकारताना दिसणार आहे. २००१ मध्ये दिल्लीतील संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सिक्रेट मिशनवर हा सिनेमा आधारित आहे. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सई ताम्हणकर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. सईला या सिनेमात पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. 

टॅग्स :सई ताम्हणकरइमरान हाश्मीमराठी अभिनेताबॉलिवूडसोशल मीडिया