Join us

अमृता सिंगच्या या गोष्टीला कंटाळला होता सैफ अली खान, पहिल्यांदाच मांडली त्याची बाजू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 8:00 AM

अमृता सिंगसोबत घटस्फोट झाल्यानंतर अनेक वर्षांनी सैफने त्यांच्या नात्याविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले होते.

ठळक मुद्देसैफने सांगितले होते की, "जेव्हा तुम्हाला वारंवार तुम्ही काहीच कामाचे नसल्याची जाणीव करून दिली जाते, तेव्हा खूप वाईट वाटतं. दरवेळी तुमच्या आई आणि बहिणीला शिव्या दिल्या जातात. त्याचा तुम्हाला खूप त्रास होतो.

सैफ अली खानने गेल्या काही वर्षांत एकापेक्षा एक चांगल्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. गेल्या वर्षी आलेल्या सेक्रेड गेम्स या वेबसिरिजमधील सैफच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. सैफ अली खानचे लग्न अभिनेत्री करिना कपूरसोबत झाले असून त्यांना तैमुर हा मुलगा आहे. सैफ आणि करिना इतकाच तैमुर देखील फेमस आहे असेच म्हणावे लागेल. सोशल मीडियावर आपल्याला तैमुरचे अनेक फॅन पेजेस पाहायला मिळतात. करिना आणि सैफ सोबत अनेकवेळा शुटिंगला तैमुर हजेरी लावतो. सैफला तैमुरसोबतच सारा आणि इब्राहिम अशी दोन मुलं आहेत. 

सारा आणि इब्राहिम ही सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलं आहेत. सैफ आणि अमृताने प्रेमविवाह केला होता. सैफपेक्षा अमृता कित्येक वर्षांनी मोठी होती. या लग्नाला सुरुवातीला सैफच्या कुटुंबियांचा विरोध होता. पण सैफ आणि अमृता त्यांच्या निर्णयावर ठाम होते. मात्र काही वर्षांपूर्वी त्या दोघांनी घटस्फोट घेतला. 

सैफ अली खानने 2005 रोजी टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत आपल्या खाजगी आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले होते. या मुलाखतीत अमृता सिंगबद्दल बोलताना सैफने सांगितले होते की, "जेव्हा तुम्हाला वारंवार तुम्ही काहीच कामाचे नसल्याची जाणीव करून दिली जाते, तेव्हा खूप वाईट वाटतं. दरवेळी तुमच्या आई आणि बहिणीला शिव्या दिल्या जातात. त्याचा तुम्हाला खूप त्रास होतो. माझ्या आयुष्यातील खूप मोठा काळ मी या परिस्थितीतून गेलो आहे". याशिवाय सैफ अली खानने घटस्फोटानंतर अमृता सिंगला दिलेल्या रकमेवरही चर्चा केली होती.

"मला घटस्फोटानंतर अमृताला पाच कोटी रुपये द्यायचे होते, ज्यामधील अडीच कोटी मी आधीच दिले आहेत. याशिवाय जोपर्यत माझा मुलगा 18 वर्षांचा होत नाही, तोपर्यंत दर महिन्याला एक लाख रुपये द्यायचे आहेत. मी कुणी शाहरुख खान नाही आणि माझ्याकडे एवढे पैसेही नाहीत. सर्व रक्कम देण्याचं आश्वासन मी दिलं असून शेवटच्या श्वासापर्यंत देत राहिन", असं सैफने या मुलाखतीत सांगितले होते.

टॅग्स :सैफ अली खान अमृता सिंगकरिना कपूर