एकमेकांना डेट करण्याआधी करीना कपूर आणि सैफ अली खानने एकत्र एक दोन चित्रपटात काम केले होते. सर्वांना माहित आहे की, टशन चित्रपटादरम्यान दोघांमध्ये प्रेम फुलू लागले आणि त्यांच्यातील जवळीकता लोकांना दिसू लागली होती. मात्र तुम्हाला माहित आहे का की, टशन चित्रपटाआधी आणखी एका चित्रपटात ते दोघे एकत्र दिसले होते. या चित्रपटाचे नाव आहे ओमकारा.
खरेतर ओमकारा चित्रपटात करीनाच्या अपोझिट अजय देवगण होता. मात्र या चित्रपटात सैफ अली खानने लंगडा त्यागीची भूमिका केली होती. या भूमिकेचे खूप कौतूक झाले होते. या चित्रपटात सैफ आणि करीनाचे खूप कमी सीन होते. त्यामुळे त्यांचे शूट वेगवेगळे झाले होते. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरीदेखील ते दोघे बऱ्याचदा एकत्र दिसतात. दोघे सेटवर तासांन तास वेळ व्यतित करायचे. एकमेकांशी खूप गप्पा मारायचे आणि एकमेकांच्या शूट संपण्याची वाट पाहायचे.
अखेर दोघे रिलेशनशीपमध्ये आले. दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले आणि मग, २०१२ साली ते दोघे लग्नबेडीत अडकले. त्यांच्या लग्नाला ८ वर्षे झाले आहेत आणि दोघे सुखी विवाहित जीवन जगत आहेत. आता सैफ आणि करीना दोन मुलांचे पालक आहेत.