क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी आणि बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागौर यांचा मुलगा सैफ अली खान याचा आज वाढदिवस. १९९२ साली ‘परंपरा’ या चित्रपटातून सैफने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. पण त्याआधी सैफने एक चित्रपट साईन केला होता. याच चित्रपटातून त्याचा डेब्यू होणार होता. या चित्रपटाचे नाव होते,‘बेखुदी’. दिग्दर्शक राहुल रवैल हा चित्रपट दिग्दर्शित करत होते. या चित्रपटासाठी त्यांनी सैफला साईन केले. पण अचानक सैफची या चित्रपटातून हकालपट्टी झाली. होय, याचे कारण म्हणजे सैफचे वागणे. दिग्दर्शक राहुल रवैल यांना सैफचे वागणे कमालीचे अनप्रोफेशनल वाटले. त्यामुळे त्यांनी ऐनवेळी सैफला काढून कमल सदानाह याला साईन केले.
‘बेखुदी’ सैफच्या हातातून निसटला. पण सैफ नवाब होता. लगेच यश चोप्रांचा ‘परंपरा’ त्याला मिळाला आणि या चित्रपटातून सैफच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली. येथे नशीबानेही साथ दिली आणि ‘परंपरा’ सुपरहिट झाला. या चित्रपटामुळे सैफचा मार्ग सोपा झाला. यानंतर आशिक आवारा, पहचान, इम्तिहान, ये दिल्लगी, मैं खिलाडी तू अनाडी असे अनेक चित्रपट त्याने केले.
सैफचे वडिल मन्सूर अली खान पतौडी भोपाळच्या शाही खानदानचे राजकुमार होते. ते भोपाळचे शेवटचे नवाब हामीदुल्ल खान यांचे पणतु होते. नवाब हमीदुल्ल खान यांनी आपली सगळी संपत्ती आपल्या मुलीच्या म्हणजेच मन्सूर अली खान पतौडी यांच्या आईच्या नावावर केली होती. त्यामुळे आईनंतर त्याचे सगळी मालकी हक्क मन्सूर अली खान पतौडी यांच्याकडे आले आणि त्यानंतर सैफ अली खानकडे. सैफ हा पतौडी साम्राज्याचा 10 वा नवाब आहे. त्यामुळे त्याचा थाट ही नवाबीच आहे.
सैफला करिनाने जी साखरपुड्यात अंगठी दिली तिचीच किंमत जवळपास 2 कोटी एवढे होती. सैफच्या ताफ्यात अनेक लॅक्झरी गाड्यांचा समावेश आहे. यात लँड क्रुझर, लेक्सस 470, बीएमडब्ल्यू , रेंज रोवर आणि आॅडी या गाड्यांचा समावेश आहे. सैफच्या गाड्यांची लिस्ट खूप मोठी आहे. सैफच्या पणजोबांची भोपाळमध्ये कोट्यावधींची मालमत्ता आहे. गाड्याप्रमाणे सैफला घड्याळांचा ही शॉकिन आहे. त्याच्याकडे अनेक महागडी घडाळं आहेत.