सैफ अली खान (Saif Ali Khan) व अमृता सिंग (Amrita Singh) हे जोडपं कधीकाळी सतत चर्चेत असायचं. आताश: दोघांचाही घटस्फोट झालाये. पण त्यांच्या रिलेशनशिपचे किस्से आजही चवीने वाचाले जातात. आज आम्ही असाच एक किस्सा तुम्हाला सांगणार आहोत.
सैफ व अमृताची पहिली भेट १९९२ मध्ये झाली होती. त्यावेळी अमृता यशाच्या शिखरावर होती आणि सैफ ‘बेखुदी’ या चित्रपटाद्वारे डेब्यू करणार होता. या चित्रपटाचा दिग्दर्शक राहुल रवैल अमृताचा मित्र होता. त्यामुळे ‘बेखुदी’च्या स्टारकास्टसोबत अमृताचं एक फोटोशूट व्हावं, अशी त्याची इच्छा होती. याच फोटोशूटदरम्यान अमृता व सैफची पहिली ओळख झाली होती. या फोटोशूटदरम्यान सैफ अमृताबरोबर जरा जास्तचं फ्रेंडली होण्याचा प्रयत्न करत होता. अमृताने ही गोष्ट नेमकी हेरली होती. अमृताला भेटायला सैफ इतका उतावीळ झाला होता की, त्यानेच फोन करून तिला दुस-यांदा भेटण्याची गळ घातली होती. सैफ डिनरसाठी विचारतोयं हे पाहून अमृतालाही धक्का बसला होता. पण अमृताने बाहेर डिनरला जाण्यास नकार दिला. त्याऐवजी तिने सैफलाचं घरी डिनरसाठी येण्याचं निमंत्रण दिलं. सैफ एका पायावर तयार झाला.
तो अमृताच्य घरी पोहोचला तेव्हा अमृताच्या चेह-यावर जराही मेकअप नव्हता. असं म्हणतात की, हीच गोष्ट सैफला खूप भावली आणि तो तिच्याकडे आकर्षित झाला. या डिनरनंतर सैफ म्हणे दोन दिवस अमृताकडेचं राहिला आणि या दोन दिवसांत दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला.
यानंतर परतीची वेळ आली तेव्हा सैफचा खिसा रिकामा होता. अगदी टॅक्सीच्या भाड्याचेही पैसे नव्हते. मग काय, त्यानं चक्क अमृताकडेच 100 रूपये उधार मागितले होते. हा अमृतासाठी दुसरा धक्का होता. अमृताने त्याला तिची कार घेऊन जाण्यास सांगितले. गाडी परत करायला येशील, त्या निमित्तानं आणखी एक भेट होईल, हा तिचा उद्देश. पुढे सैफ व अमृता भेटत राहिले आणि 1991 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. दोन मुलं झाली. यानंतर दोघांत असं काही बिनसलं की 2004 मध्ये दोघांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला.