Join us  

सैफ-करिनामध्ये खरंच बिनसलंय? अभिनेत्यानं हटवला करिनाच्या नावाचा टॅटू; सोशल मीडियावर होतीये घटस्फोटाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 1:30 PM

'परफेक्ट फॅमिली' आणि 'परफेक्ट कपल' असणाऱ्या या दोघांमध्ये आता काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे. 

अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांना बॉलिवूडमधील पॉवर कपल मानलं जातं. अलीकडेच सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघेही त्यांच्या इमारतीखाली कीस करताना दिसून आले होते. या व्हिडीओमुळे सैफ अली खान आणि करीना कपूर खान ट्रोलही झाले. यातच सोशल मीडियावर 'परफेक्ट फॅमिली' आणि 'परफेक्ट कपल' असणाऱ्या या दोघांमध्ये आता काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे. 

सैफ अली खानने 2007 मध्ये 'टशन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीना कपूरला डेट करायला सुरुवात केली होती. त्यादरम्यान सैफने डाव्या मनगटावर करीना नावाचा टॅटू काढला होता. मात्र, आता नुकतेच व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये सैफ अली खान याने करिनाच्या नावाचा टॅटू काढून टाकल्याचे दिसतंय. हेच नाही तर करीनाच्या नावाऐवजी तिथे आता वेगळाच टॅटू दिसून येत आहे. करिनाच्या नावाचा टॅटू हा सैफने महादेवच्या त्रिशूलच्या टॅटूने झाकून टाकला आहे.  यामुळे चाहते हैराण झालेत. या दोघांच्या नात्यात काही बिनसल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, सैफने त्याच्या एका चित्रपटासाठी तो टॅटू कव्हर करून घेतलाय. सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सैफ हा टॅटू काढून टाकेल आणि जुना करिनाच्या नावाचा टॅटू पुन्हा दिसू लागेल. सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले तर सैफ अली खान 'देवारा'च्या रिलीजच्या तयारीत आहे. या चित्रपटात तो ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरसोबत दिसणार आहे. या चित्रपटातून जान्हवी साऊथमध्ये पदार्पण करणार आहे. या तेलगू भाषेतील चित्रपटात सैफ एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :सैफ अली खान सेलिब्रिटीबॉलिवूडकरिना कपूर