‘रंगून’मध्ये सैफ अली खानने असा रंगविला रुसी बिल्मोरिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 1:12 PM
विशाल भारद्वाज दिग्दर्शित रंगूनमध्ये सैफ अली खानचा आतापर्यंतचा सर्वांत चांगला अभिनय पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सैफ अली ...
विशाल भारद्वाज दिग्दर्शित रंगूनमध्ये सैफ अली खानचा आतापर्यंतचा सर्वांत चांगला अभिनय पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सैफ अली खानने विशाल भारद्वाज सोबत यापूर्वी ओमकारा या चित्रपटात भूमिका केली आहे. आता पुन्हा एकदा ‘रंगून’मधून ही जोडी पडद्यावर आपली जादू दाखविणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान रुसी बिल्मोरिया ही भूमिका साकारत आहे. ‘रंगून’चा मेकिंग व्हीडिओ यू-ट्यूबबवर शेअर करण्यात आला आहे. यात सैफच्या भूमिके ची माहिती देण्यात आली आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित रंगूनमध्ये अभिनेत्री कंगना राणौत मिस जुलिया, शाहिद कपूर नवाब मलिक या सैनिकाच्या तर सैफ अली खान हा रुसी बिल्मोरिया या चित्रपट निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे. यात सैफ अली खानच्या भूमिकेचा उलगडा करणारा १ मिनिट ३९ सेंकदाचा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. यातून सैफच्या कॅरेक्टरची माहिती देण्यात आली आहे. रुसी हा श्रीमंत असून त्याचे राहणीमान अगदी ब्रिटीशांसारखे आहे. इंग्रज जे भारतासाठी करीत आहे ते योग्य आहे असा त्याचा विश्वास आहे. त्याचा स्वभाव नाटकी, आक्रमक, तापट आहे. श्रीमंत असल्याने तो स्वत:ला शक्तीशाली समजतो. मात्र तो कंगनाच्या प्रेमात पडतो. प्रेम ठरवून होत नाही असे म्हणताना तो दिसतो आहे. या व्हीडिओच्या माध्यमातून सैफ सोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल कंगना म्हणते, सैफ सोबत काम करण्याची मजा काही औरच आहे. तो सज्जन माणूस आहे. असा सज्जन ज्याच्या दरवाज्यात तुम्ही जाता आणि तो तुम्हाला बसायला खुर्ची देतो. या व्हीडिओमध्ये कंगना-शाहिद-सैफ मजा करताना दिसत आहेत. २४ फेब्रुवारीला रिलीज होणाºया ‘रंगून’या चित्रपटाची कथा १९४० च्या दशकातील असून, या चित्रपटाला द्वितीय महायुद्धाची पार्श्वभूमी आहे. या चित्रपटामध्ये कंगना एका अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसेल.