Saif Ali Khan Kareena kapoor Video : सैफ अली खान व करिना कपूर खान हे बॉलिवूडचं डॅशिंग कपल. या जोडप्याचे असंख्य चाहते आहेत. म्हणूनच दोघांचे फोटो क्षणात व्हायरल होतात. सैफ व करिना एकत्र दिसले रे दिसले की पापाराझी त्यांचे फोटो क्लिक करण्यासाठी गर्दी करतात. काल रात्री हेच घडलं. सैफिना मलायका अरोराच्या आईच्या वाढदिवसाच्या पार्टीतून रात्री उशीरा घरी परतले. बघतात काय तर, बिल्डिंगबाहेर इतक्या रात्री पापाराझींनी गर्दी केली होती. सैफिना गाडीतून उतरले आणि बिल्डिंगकडे जाऊ लागले आणि पापाराझींनी त्यांचे फोटो क्लिक करायला सुरूवात केली. अगदी बिल्डिंगच्या दरवाज्यात प्रवेश करेपर्यंत पापाराझी फोटो क्लिक करत होते. अशावेळी कुणालाही राग येणारच. सैफही काहीसा भडकला.
खरं तर सैफ पापाराझींवर कधीही रागावत नाही. अगदी त्यांची थट्टा मस्करी करत त्यांना पोझ देतो. पण पापाराझी अगदी बिल्डिंगच्या गेटपर्यंत आले म्हटल्यावर तो काहीसा नाराज झाला. एक काम किजीए, हमारे बेडरूम में आ जाईए..., असं तो काहीशा नाराजीच्या सूरात म्हणाला. व्हिडीओत त्याची नाराजी स्पष्ट दिसतेय. यावेळी करिनाला हसू आवरलं नाही.
काही वर्षांआधी पापाराझी कल्चरवर सैफने स्पष्ट शब्दांत नाराजी बोलून दाखवली होती. तैमूरच्या फोटोंसाठी पापाराझी तुटून पडतात, यावर रिॲक्ट करताना त्याने नाराजी व्यक्त केली होती. मीडियाला आमच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरेस्ट आहे आणि म्हणून लोकांनाही आहे. तैमूरचे फोटो मीडियाला आवडतात, लोकांना आवडतात, तर मी काय बोलणार. तैमूरचे फोटो पाहून लोक आंनदी होतात, हे खरं आहे. पण मला कधीकधी आश्चर्य वाटतं, एका लहान मुलामध्ये लोकांना इतका इंटरेस्ट का आहे. मला कुणाच्याही लहान मुलात कधीच इतका इंटरेस्ट वाटला नाही, असं तो म्हणाला होता. सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर लवकरच तो आदिपुरूष या सिनेमात झळकणार आहे. यात तो रावणाची भूमिका साकारताना दिसेल.