करिना कपूर व सैफ अली खानच्या लग्नाला उणीपुरी सहा वर्षे पूर्ण झालीत. पण लग्नाच्या सहा वर्षांनंतर सैफने बेगम करिनाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. होय, करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’ या चॅट शोमध्ये सैफला करिनाबद्दल बरेच काही विचारण्यात आले. करिनाच्या कुठल्या सवयी आवडतात, कुठल्या नाही, असे अनेक. करिनातील सगळ्यांत चांगला गुण कुठला? यावर करिना अतिशय प्रामाणिक आणि सकारात्मक आहे. तिच्यातील हे दोन गुण मला खूप आवडतात, असे नवाबसैफ म्हणाला. तिच्या कुठल्या गोष्टीची चीड येते, असाही एक प्रश्न सैफला विचारला गेला. सैफ या प्रश्नाचे उत्तर शिताफीने टाळणार, असे वाटत असतानांच त्याने मात्र यावर बिनधास्त उत्तर दिले. काही गोष्टींची ती अतिचिंता करते. विशेषत: तैमुरबद्दल ती सतत टेन्शनमध्ये असते, याची मला चीड येते, असे सैफ म्हणाला. करिनाची कुठली गोष्ट तुला सहन करावी लागते, यावर नवाबने काय उत्तर द्यावे? तर जणू ती फोनवरचं जिवंत असल्यासारखे भासवते, असे सैफ म्हणाला. म्हणजेच, करिनाचे मोबाईलचे व्यसन सैफला सहन करावे लागते.सन २०१२ मध्ये करिना व सैफचे लग्न झाले होते. अगदी तेव्हाही सैफिना एकमेकांपासून अगदीच भिन्न आहेत, अशी चर्चा होती. सैफ काहीसा आतल्या गाठीचा आहे तर करिना अगदी बेधडक़ अर्थात या भिन्न स्वभावानंतरही दोघेही आनंदाने नांदताहेत, हेच खरे.सैफच्या चित्रपटांबद्दल सांगायचे तर अलीकडे त्याचा ‘बाजार’ हा चित्रपट रिलीज झाला होता. लवकरचं तो ‘हंटर’ आणि ‘तानाजी’ या चित्रपटात दिसणार आहे. करिनाचे म्हणाल तर धर्मा प्रॉडक्शनच्या ‘तख्त; चित्रपटात तिची वर्णी लागली आहे. याशिवाय ‘गुड न्यूज; या चित्रपटात बेबो अक्षय कुमारसोबत आॅनस्क्रिन रोमान्स करताना दिसणार आहे.
‘बेगम’च्या ‘या’ सवयीला त्रासला सैफ; लग्नाच्या ६ वर्षांनंतर केला मोठा खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 3:44 PM
करिना कपूर व सैफ अली खानच्या लग्नाला उणीपुरी सहा वर्षे पूर्ण झालीत. पण लग्नाच्या सहा वर्षांनंतर सैफने बेगम करिनाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे
ठळक मुद्देकरण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’ या चॅट शोमध्ये सैफला करिनाबद्दल बरेच काही विचारण्यात आले.तिच्या कुठल्या गोष्टीची चीड येते, असाही एक प्रश्न सैफला विचारला गेला. सैफ या प्रश्नाचे उत्तर शिताफीने टाळणार, असे वाटत असतानांच त्याने मात्र यावर बिनधास्त उत्तर दिले.