Join us

घटस्फोटानंतरही सैफ अली खान या कारणामुळे आजही काढतो अमृता सिंगची आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 2:37 PM

सैफ अलीचे करिनाच्याआधी अभिनेत्री अमृता सिंगसोबत लग्न झाले होते. अमृता आणि सैफ यांचा प्रेमविवाह झाला होता.

ठळक मुद्देअमृताचा घटस्फोट झाला असला तरी आजही सैफ त्याच्या पहिल्या पत्नीची आठवण काढतो. अमृतामुळे सैफ आपल्या आयुष्यात यश मिळवू शकला असे त्याचे म्हणणे आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक जोडी म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूर खान. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते. १६ ऑक्टोबर २०१२ साली सैफ आणि करिना लग्नबेडीत अडकले होते. त्यांच्या लग्नाला आता आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव तैमूर आहे. तो लहानपणापासून प्रचंड लोकप्रिय आहे. तर करिना आणि सैफ आता दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत.

सैफ अलीचे करिनाच्याआधी अभिनेत्री अमृता सिंगसोबत लग्न झाले होते. अमृता आणि सैफ यांचा प्रेमविवाह झाला होता. सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला असला तरी आजही सैफ त्याच्या पहिल्या पत्नीची आठवण काढतो. अमृतामुळे सैफ आपल्या आयुष्यात यश मिळवू शकला असे त्याचे म्हणणे आहे. अमृता सैफच्या आयुष्यात आल्यानंतर तिनेच त्याला करियरकडे गांभीर्याने पाहायला शिकवले. सैफनेच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी सांगितले आहे. सैफने अमृताविषयी सांगितले की, मी अमृतासोबत लग्न केले त्यावेळी मी केवळ २० वर्षांचा होतो. तिनेच मला कामात अधिकाधिक लक्ष द्यायला शिकवले. तिच्यामुळेच मी या करियरकडे गांभीर्याने पाहू लागलो. 

अमृता आणि सैफ यांचे लग्न १९९१ मध्ये झाले होते. त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम अशी दोन मुलं आहेत. पण त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. २००४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर त्यांची दोन्ही मुलं अमृतासोबतच राहातात. घटस्फोटानंतर काही वर्षांनी म्हणजेच २०१२ मध्ये करिना आणि सैफचे लग्न झाले. सैफने लग्न केले असले तरी अमृताने दुसरे लग्न केले नाही. करिनासोबत सैफच्या दोन्ही मुलांचे नाते खूपच चांगले आहे. तसेच करिना आणि सैफचा मुलगा तैमुरसोबत देखील अनेकवेळा त्यांना पाहाण्यात येते. त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला देखील तैमुरसोबतचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात. 

टॅग्स :सैफ अली खान अमृता सिंग