करिना कपूरच्या 'या' सवयींमुळे तिच्यामागे वेडा आहे सैफ अली खान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 8:09 AM
अभिनेता सैफ अली खानचे आपली बेगम करिना कपूर खानवरचे प्रेम सगळ्यांना माहिती आहे. सैफ अली खानचे म्हणणे आहे की ...
अभिनेता सैफ अली खानचे आपली बेगम करिना कपूर खानवरचे प्रेम सगळ्यांना माहिती आहे. सैफ अली खानचे म्हणणे आहे की त्याच्या पत्नीमध्ये अनेक खास गोष्टी आहेत. आपला आगामी चित्रपट कालाकांडीच्या प्रमोशनमध्ये सध्या सैफ बिझी आहे. या चित्ररपटाच्या प्रमोशन दरम्यान तो करिना बद्दल म्हणाला की, तिच्या अनेक वैशिष्ट्य आहेत जसे टाईम मॅनेजमेंट, काम करण्याची तिची पद्धत, फिटनेस बाबत अर्लटनेस, शिस्त आणि यासगळ्या तिच्यात एक जिद्द सुद्धा आहे. सैफने बॉलिवू़डमध्ये 25 वर्ष पूर्ण केले आहेत आणि याला तो एक इटरेस्टिंग जर्नी मानतो. सैफ आणि त्याची पूर्वी प्नी अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान अभिषेक कपूरच्या केदारमनाथ चित्रपटातून बॉलिवू़डमध्ये पदार्पण करते आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सैफने आपल्याला आतापर्यंत आलेल्या अनुभवाच्या पार्श्वभूमिवर मुलाल सल्ला दिला आहे की, ''त्याने करिअरमध्ये अनेक चढ-उतार बघितले आहेत. मात्र हे सगळे चागले वाईट अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. ALSO READ : करिना कपूर-खानने शेअर केले ग्लॅमरस फोटो; यूजर्सनी म्हटले, ‘भयानक दिसत आहेस’!या चित्रपटात सैफ शिवाय कुणाल रॉय कपूर, विजय राज, अमायरा दस्तूर, दीपक डोबरियाल, अक्षय ओबरॉय, ईशा तलवार, नील भूपलम, शिवम पाटील सारखे कलाकार आहेत. हा चित्रपट 12 जानेवारी 2018 ला रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे अक्षत वर्मा डायरेक्शन डेब्यू करतो आहे. हा एक डार्क कॉमेडी थ्रीलर आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात ७३ कट्स सांगितले होते. सैफ कॅन्सरने पीडित असल्याचे ट्रेलरमध्ये दिसते. सैफला पोटाचा कॅन्सर असल्याचे निदान होते. तुला आनंद मिळेल, त्या सगळ्या गोष्टी कर, असे डॉक्टर त्याला सांगतात. नंतर सैफ वेगवेगळ्या झोनमध्ये जातो, असे ट्रेलरमध्ये दिसते. याचदरम्यान ट्रेलरमध्ये दीपक डोबरियाल आणि विजय राज यांची एन्ट्री दाखवली आहे. हे दोघेही पैशाचे लोभी असतात. शोभिता धुलिपाला आणि कुणाल राय कपूर यांचे प्रेम आणि अक्षय ओबेरॉय याची वासना हेही ट्रेलरमध्ये दिसले. सैफची विचित्र हेअरस्टाईल, त्याचे फरकोटमधील लूक सगळेच तुमच्या मनात उत्सुकता निर्माण करते. डार्क कॉमेडी सिनेमात बोल्डनेसचा तडकाही असणार आहे.