Join us

करीना समजून दुसऱ्याच मुलीच्या खांद्यावर ठेवला हात, सैफ अली खानचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 4:52 PM

सैफला स्वत:लाच आलं हसू, तर करीनाची होती अशी रिअॅक्शन

बॉलिवूडची रॉयल जोडी सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) नेहमीच कपल गोल्स देतात. सोशल मीडियावर सतत त्यांची चर्चा असते. दोघंही मुलांसोबत त्यांच्या खानदानी पटौदी पॅलेसमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. ख्रिसमस आणि नवीन वर्षाची सुरुवात ते जंगी करत आहेत. दरम्यान सैफ करीना विमानतळावर होते तेव्हा सैफसोबत एक मजेशीर किस्सा घडला. सध्याच्या ट्रेंडनुसार तो सैफसाठी 'मोए मोए' मोमेंट होता.

सैफ अली खान, करीना कपूर खान, तैमूर आणि जेह अली खान काल विमानतळावर पोहोचले. गुरगावला असणाऱ्या पटौदी पॅलेसकडे ते रवाना झाले. यावेळी सैफ कॅज्युअल लूकमध्ये दिसला. ब्लू टीशर्ट, पँट, जॅकेट आणि कॅप असा त्याचा सिंपल लूक होता. तर करीना व्हाईट शर्ट, लाल रंगाच्या जॅकेटमध्ये दिसली. यावेळी सैफने करीना समजून दुसऱ्याच मुलीच्या खांद्यावर हात ठेवला. जेव्हा त्याने समोर करीनाला पाहिलं तेव्हा त्याला कळलं की आपण वेगळ्याच मुलीच्या खांद्यावर हात ठेवला. यानंतर त्याचं त्यालाच हसू आलं. तर करीनालाही हसू आवरलं नाही. इन्स्टंट बॉलिवूडने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

सैफच्या या मजेशीर व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 'करीना म्हणत असेल घरी चल मग सांगते','दोघी लाल ड्रेसमध्ये होत्या म्हणून कदाचित बिचारा सैफ कन्फ्युज झाला','सैफची तर खैर नाही' अशा कमेंट्स व्हिडिओवर आल्या आहेत .

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूरसोशल मीडियाट्रोल