सैफ अली खानची सेक्रेड गेम्स 2 ही वेबसिरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या वेबसिरिजला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. पण यातील सरताजची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. त्याने दिल चाहता है, ओमकारा, रहना है तेरे दिल में, हम तुम, हम साथ साथ है, लव्ह आज कल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांच्याप्रमाणे सैफ सुपरस्टार नसला तरी सैफकडे आज या तिघांइतकीच संपत्ती आहे.
सैफ अली खान हा नवाब असून पतौडी मध्ये त्यांची खूप सारी संपत्ती आहे. सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान पतौडी हे प्रसिद्ध क्रिकेटर होते. त्यांनी भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांनी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूपत्रात मुलासाठी म्हणजेच सैफसाठी त्यांच्या संपत्तीतील मोठा वाटा दिला आहे. तसेच काही संपत्ती सोहा आणि साबा या मुलींच्या नावावर केली आहे. सैफच्या पतौडी पॅलेसची किंमत जवळजवळ 750 करोड असल्याचे म्हटले जाते. पण सैफनुसार वडिलोपार्जित संपत्तीची किंमत ही पैशांत मोजता येत नाही. त्यामुळे या संपत्तीची बाजार किंमत किती आहे हे त्याने कधीही काढलेले नाही.
झुमच्या रिपोर्टनुसार सैफ अली खान हा बॉलिवूडमधील अतिशय श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. त्याला आमिर, सलमान आणि शाहरुख यांच्यापेक्षा चित्रपट करण्यासाठी कमी पैसे मिळत असले तरी त्याच्याकडे त्यांच्याइतकाच पैसा आहे. त्याच्याकडे जवळजवळ 1100 करोडची संपत्ती असून तो वर्षाला जवळजवळ 55 कोटी कमवतो. सैफ अली खानकडे अनेक महागड्या गाड्या, वस्तू आहेत. सैफकडे घडाळ्यांचे तर प्रचंड कलेक्शन आहे. तो दिवसातून तीन घड्याळ तरी बदलतो. सैफचे मुंबईत 48 कोटींचे घर असण्यासोबतच स्विर्झलँडमध्ये त्याचे एक अलिशान घर आहे. या घराची किंमत जवळजवळ 33 कोटी रुपये आहे. तो अनेकवेळा आपल्या कुटुंबियांसोबत येथे जातो.