सैफ अली खानची बेगम करीना कपूर येत्या 21 सप्टेंबरला आपला बर्थ डे सेलिब्रेट करतेय. करीनाच्या बर्थ डेसाठी सैफ अली खान कुटुंबासोबत पतौडी पॅलेसला गेला आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार सैफ अली खान पतौडी पॅलेसचा रस्ता विसरला. एअरपोर्टवरुन सैफने टॅक्सी हायर केली करीना मागच्या सीटवर बसली आणि सैफ पुढच्या सीटवर. जवळपास 2.30 च्या दोघे पतौडी शहरात पोहोचले.
सैफ मात्र पॅलेसकडे जाण्याएवजी बाजाराच्या रस्त्याच्या दिशेने पुढे गेला. थोडा अंतरानंतर सैफला कळले की तो चुकीच्या रस्त्याने पुढे जातो आणि मग त्याने तिथल्या काही विद्यार्थ्यांना रस्ता विसरला. सैफला बघून त्या विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याने त्याला पॅलेसकडे जाण्याचा बरोबर रस्ता सांगितला. रस्ता सांगणाऱ्या विद्यार्थ्यांनी सैफसोबत सेल्फि काढण्याची संधी मात्री सोडली नाहीय.