सैफ अली खान (Saif Ali Khan ) व करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) बॉलिवूडचं चर्चित स्टार कपल आहे. त्यांचा लाडका लेक तैमूर अली खान (Taimur Ali Khan) याची लोकप्रियता तर आईबाबापेक्षाही अधिक आहे. जन्मापासूनच तैमूर चर्चेत आहे. अगदी तैमूर दिसला रे दिसला की मीडियाचे कॅमेरे त्याच्याकडे वळतात. तैमूरचा लहान भाऊ जेह हा सुद्धा तितकाच लोकप्रिय आहे. आता सैफ अली खान आपल्या मुलांना मिळणाऱ्या या अमाप प्रसिद्धीबद्दल बोलला आहे. तैमूरला मीडियाकडून प्रचंड अटेंशन मिळतं. पण बाप म्हणून मला हे अजिबात आवडत नाही, असं सैफ म्हणाला.
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत सैफ बोलला. तो म्हणाला, ‘सैफला मीडियाचं प्रचंड अटेंशन मिळतं. यामुळे शाळेतही त्याला स्पेशल अटेंशन मिळतं. जे मला अजिबात आवडत नाही. शाळेत स्टार किड्सला इतकं महत्त्व दिलं गेलं नसतं तर बरं झालं असतं. तैमूर लहान मुलगा आहे आणि बाकीच्या मुलांसारखं त्यानेही मुक्तपणे बागडावं, अशी माझी इच्छा आहे. परंतु सध्या तरी हे होत नाहीये. तैमूरला आत्तापासूनच त्याच्या स्टारडमची जाणीव आहे. पण ही जाणीव त्याला स्वत:हून आलेली नाही. मला आणि करिना आम्ही दोघंही हे जाणतो. सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं हे आम्ही त्याला शिकवलं आहे. पण कधीकधी तैमूरला मिळणाऱ्या मीडिया अटेंशनमुळे आमची सुद्धा चिडचिड होते. म्हणूनच या सर्व गोष्टींपासून स्वत:ला व तैमूरला दूर ठेवण्यासाठी मी आपल्या कुटुंबाला घेऊन विदेशात सुट्टीसाठी जातो. कारण तिथे तैमूरला मुक्तपणे वावरायला वाव मिळतो.’
मध्यंतरी तैमूर प्रचंड ट्रोल झाला होता. फोटोग्राफर्सने फोटो घेण्याचा प्रयत्न केला असता तैमूर ‘बंद करो’, असं म्हणत त्यांच्यावर चवताळला होता. त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता आणि हा व्हिडीओ पाहून लोकांनी तैमूरला ट्रोल केलं होतं. अगदी त्याच्या अम्मी-अब्बूचे संस्कार काढले होते. खान कुटुंबाने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता सैफची बहिण सोहा अली खानचा पती कुणाल खेमूनं तैमूरला ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिलं आहे. तैमूरची आत्या सबा अली खान ही सुद्धा संतापली होती.
‘आम्ही तैमूरचे फॅन आहोत, आम्ही त्याला फॉलो करतो, असं ऐकून मला आधी आश्चर्य वाटायचं. कारण तो तेव्हा अगदी एक वर्षाचा होता. आता लोक त्याला ट्रोल करतात, हे बघून मी हैराण आहे. तो 5 वर्षाचा मुलगा आहे आणि ट्रोलिंगचा अर्थ माहित नसलेल्या इतक्या लहान मुलाला लोक ट्रोल करत आहेत. मुलं मोठी होत आहेत, ते बदलणार. शिकणार, त्यांना त्यांच्यासारखं वागू द्या. तुम्हाला प्रशंसक वा टीकाकार होण्याची गरज नाही, असं सबा म्हणाली होती.