सेक्रेड गेम्स या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला व या सीरिजमधील सर्व पात्रांनी रसिकांच्या मनात घर केलं. त्यानंतर नुकतीच या सीरिजच्या दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली आहे. दुसरा सीझन १५ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दुसऱ्या सीझनबाबत जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. नुकतेच या सीझन २मधील कलाकारांचा रेट्रो लूक प्रदर्शित करण्यात आला. सेक्रेडमध्ये सरताज सिंगची भूमिका साकारणारा अभिनेता सैफ अली खानने एका मुलाखतीत या सीरिजच्या कथेविषयी खुलासा केला आहे.
अमर उजालाच्या रिपोर्टनुसार सैफ अली खाननं सेक्रेड गेम्सबद्दल सांगितलं की, मी नेटफ्लिक्सवरील बरेच शोज पाहिले आहेत आणि मला ते आवडलेदेखील. हे पूर्णपणे वेगळं माध्यम आहे. इथे मीसुद्धा निर्माता होऊ शकतो असा विचार सुरू असतानाच मला सेक्रेड गेम्सची ऑफर आली आणि मी जराही विचार न करता होकार दिला.
‘एलओसी’मध्ये जेव्हा मी पाकिस्तानी सैन्याला पाहतो तेव्हा शिव्या देणारे एक-दोन संवाद होते. सेन्सॉरशिपमुळे त्या संवादावर कात्री लागली. वेब सीरिजमध्ये असं होत नाही. खऱ्या आयुष्यात जे जसं असतं ते तसंच दाखवलं जातं. खऱ्या आयुष्यात राग आल्यास आपण अपशब्द वापरतोच ना.