Join us

सैफ अली खानला कधी मिळणार डिस्चार्ज? डॉक्टरांनी दिली तब्येतीविषयी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 17:29 IST

लीलावती रुग्णालयातील डॉक्टर नितीन डांगे यांची माहिती

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) दोन दिवसांपासून लीलावती रुग्णालयात आहे. घरातच घुसलेल्या एका अज्ञाताने हल्ला केल्यामुळे सैफ गंभीर जखमी झाला होता. सर्जरी करुन त्याच्या शरिरात घुसलेला काही इंच चाकूचा तुकडाही काढण्यात आला. सध्या सैफ नॉर्मल वॉर्डमध्ये असून त्याला आज डिस्चार्ज मिळण्याचीही शक्यता होती. मात्र आता डॉक्टरांनी त्याच्याबाबतीत महत्वाची अपडेट दिली आहे. 

लीलावती रुग्णालयातील डॉक्टर नितीन डांगे यांनीच सैफवर सर्जरी केली. सैफला आज डिस्चार्ज मिळू शकला नाही. याबद्दल ते म्हणाले, "सैफला रुग्णालयातून घरी पाठवण्याचा निर्णय पुढील १-२ दिवसात घेतला जाईल. सध्या तो हळूहळू बरा होत आहे. वॉकही करत आहे. त्याच्या मणक्यात जखम आहे त्यामुळे इंजेक्शन व्हायच्या शक्यता जास्त आहेत. म्हणूनच त्यांना भेटायला येणाऱ्यांनाही आता थांबवण्यात आलं आहे. तो  पुढील २ दिवसात त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. मात्र काही महिने त्याला आराम करायची गरज आहे."

सैफ अली खानवर बांद्रा येथील त्याच्या घरातच हल्ला झाला. आरोपी शरीफुल इस्लाम शहजादला पोलिसांनी कालच अटक केली. तो सैफच्या घरात कसा घुसला, त्याने तिथे काय केलं, घटनेनंतर तो कुठे गेला याबद्दल त्याने अनेक खुलासे केले आहेत. पोलिस या प्रकरणात सैफचाही जबाब घेणार आहेत. तसंच आरोपीला सैफच्या घरी जाऊन क्राईम सीन चा आढावा घेणार आहेत. 

टॅग्स :सैफ अली खान हॉस्पिटलमुंबई