विराट कोहलीनंतर सैफ अली खानही घेणार पितृत्व रजा;  म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 02:57 PM2021-02-08T14:57:23+5:302021-02-08T15:01:52+5:30

करिना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे.

saif ali khan will take paternity leave as he feels that watching children growing up is important | विराट कोहलीनंतर सैफ अली खानही घेणार पितृत्व रजा;  म्हणाला...

विराट कोहलीनंतर सैफ अली खानही घेणार पितृत्व रजा;  म्हणाला...

googlenewsNext
ठळक मुद्दे1993 मध्ये यश चोप्रांच्या ‘परंपरा’ या चित्रपटातून सैफने बॉलिवूड डेब्यू केला होता.

करिना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. पुढील आठवड्यात करिना दुसºया बाळाला जन्म देणार असल्याचे कळतेय. दुस-या प्रसूतीपूर्वी बेबो सर्व तयारी पूर्ण करतेय. हातात असलेल्या सगळ्या प्रोफेशनल कमिटमेंट तिने पूर्ण केल्या आहेत. सैफचे म्हणाल तर तो सुद्धा आपल्या दुस-या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहे. इतकेच नाही तर बाळाला अधिकाधिक वेळ देता यावा म्हणून सैफ पॅटर्निटी लिव्ह अर्थात पितृत्व रजा घेणार आहे.

एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही माहिती दिली. घरी नवा पाहुणा येणार असता, पत्नीची प्रसूती होणार असताना कोणाला काम करायला आवडेल? आपल्या मुलाला वाढताना बघण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही चुकताय. त्यामुळे मी माझ्या बाळासोबत मनसोक्त वेळ घालवणार आहे, असे सैफ म्हणाला.
सैफच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडे त्याची ‘तांडव’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. यात सैफ लीड रोलमध्ये होता. या वेबसीरिजवरून बराच वाद झाला होता.
सैफ अलीने 1991 साली अभिनेत्री अमृता सिंगसोबत लग्न केले होते. 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. दोघांनाही सारा व इब्राहिम असे दोन मुले आहेत. 2012 मध्ये सैफने करिना कपूरसोबत दुसरे लग्न केले. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव तैमूर आहे.  

1993 मध्ये यश चोप्रांच्या ‘परंपरा’ या चित्रपटातून सैफने बॉलिवूड डेब्यू केला होता. मात्र सैफचा हा पहिलाच चित्रपट आपटला. यानंतर याचवर्षी त्याचा ‘आशिक आवारा’ हा चित्रपट आला. हा चित्रपटही फ्लॉप राहिला. पण या चित्रपटाने सैफला बेस्ट मेल डेब्यूचा पुरस्कार मिळवून दिला. याच्या पुढच्या वर्षी आलेल्या ‘ये दिल्लगी’ या चित्रपटाने सैफला खरी ओळख दिली. यानंतर ‘मैं खिलाडी तू अनाडी’हा सैफचा चित्रपटही हिट झाला. यानंतर 1995 ते 1998 या काळात सैफचे एकापाठोपाठ एक असे नऊ चित्रपट आलेत. पण सगळेच दणकून आपटले. पण हे अपयश सैफने मोठ्या मनाने पचवले. 1999 मध्ये ‘मुंबई मेरी जान’,‘कच्चे धागे’,‘आरजू’, ‘हम साथ साथ है’ असे चित्रपट त्याने केलेत, जे हिट राहिलेत. 
यानंतर ‘कल हो ना हो’,‘सलाम नमस्ते’,‘ओंकारा’,‘टशन’,‘परिणीता’, ‘हम तुम’ असे हिट चित्रपट त्याने दिलेत.

Web Title: saif ali khan will take paternity leave as he feels that watching children growing up is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.