Join us

सैफ अन् शाहीदच्या मिशांमुळे इतकी का वैतागली कंगना राणौत?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2017 11:34 AM

अभिनेत्री कंगना राणौत सध्या ‘रंगून’ मुळे चर्चेत आहे. पण या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान कंगनाला भलत्याच अडचणीचा सामना करावा लागला. होय, ...

अभिनेत्री कंगना राणौत सध्या ‘रंगून’ मुळे चर्चेत आहे. पण या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान कंगनाला भलत्याच अडचणीचा सामना करावा लागला. होय, शाहिद कपूर आणि सैफ अली खान यांच्या मिशीमुळे कंगना जाम वैतागली. आता कशी तर, पुढे वाचा. ‘रंगून’मध्ये भरपूर किसींग सीन्स आहेत, हे तुम्ही जाणताच. हे सीन्स देताना  सैफ आणि शाहिदच्या मिशा नेमक्या अडचणीच्या ठरल्या आणि कंगनाची चांगलीच गोची झाली.एका मुलाखतीत खुद्द कंगनानेच याचा खुलासा केला. ती म्हणाली, सैफ आणि शाहिद या दोघांच्या मिशीने मला चांगलेच छळले. विशेषत: शाहिदसोबतचा किसींग सीन करताना मला त्रास झाला. कारण त्याची मिशी चांगलीच पिळदार होती. त्याची ती मिशी म्हणजे, आमच्या किसींग सीन्समधला मोठा अडथळा होता. अलीकडे ‘रंगून’चा ट्रेलर आला. यात कंगना सैफ व शाहिद दोघांसोबत अगदी बिनधास्त इंटिमेट होताना दिसतेय. कंगनाने याआधी कधीच कुठल्या चित्रपटात इतके बोल्ड सीन्स दिलेले नाहीत. पण हे सीन्स देताना कंगनाला किती अडचणींचा सामना करावा लागला, हे आता तुम्हाला कळले असेलच.ALSO READ :Ye Ishq Hai Song Launch : शाहिद कपूर-कंगना राणौत यांची  Sizzling Chemistry‘रंगून’चा ट्रेलर: ‘वॉर’ आणि ‘रोमान्स’ एकाच ठिकाणी!! विशाल भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटात कंगना ज्युलियाची भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगना आधी सैफसोबत दिसते तर नंतर शाहिदसोबत. म्हणजेच, सैफ आणि शाहिद या दोघांच्या लेडी लव्हची भूमिका कंगना यात साकारतेय. फेबु्रवारीच्या अखेरच्या आठवड्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘रंगून’ची कथा १९४० च्या दशकातील आहे.  द्वितीय महायुद्धाची पार्श्वभूमी असलेल्या या  चित्रपटासाठी कंगनाने  ‘फिअरलेस नादिया’पासून प्रेरणा घेतली असल्याचे सांगण्यात येते.