दिवंगत बॉलिवूड अभिनेता दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांची प्रकृती खालावली आहे. काही दिवसांपूर्वी सायरा बानू यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. ज्यामुळे त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात सायरा बानू यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना हृदयाशी निगडीत समस्या असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांची एंजिओग्राफी करावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र, सायरा बानू यांनी एंजिओग्राफी करण्यास नकार दिला आहे.
चार दिवसांपूर्वी सायरा बानू यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून डॉ. नितीन गोखले त्यांच्यावर उपचार करत आहेत. "सायरा बानू यांचं लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल झालं आहे. त्यामुळे त्यांची एंजिओग्राफी करावी लागेल. त्यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार केले जातील", असं डॉक्टरांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. मात्र, सायरा बानू यांनी एंजिओग्राफी करण्यास नकार दिला आहे.
बाळाचे वडील कोण? प्रश्न विचारणाऱ्यांना नुसरत जहाँ यांनी दिलं सडेतोड उत्तर
सायरा बानू यांचा एंजिओग्राफीला नकार
"सायरा बानू यांच्या प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा झाल्यानंतरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल. त्यानंतर काही काळानंतर पुन्हा त्यांना एंजिओग्राफीसाठी रुग्णालयात दाखल व्हावं लागेल. एंजिओग्राफी करण्यासाठी त्यांची परवानगी असणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु, त्यांनी एंजिओग्राफीसाठीची परवानगी अद्याप दिलेली नाही", असं डॉक्टर म्हणाले.
सायरा बानू एक्युट कोरोनरी सिंड्रोमने त्रस्त?
दिलीप कुमार यांचं निधन झाल्यानंतर सायरा बानू यांची प्रकृती खालावली आहे. याच काळात श्वास घेण्यास अडथळा, उच्च रक्तदाब आणि हाय शुगरचा त्रास जाणवल्यामुळे त्यांना २८ ऑगस्टला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासामध्ये त्यांना एक्युट कोरोनरी सिंड्रोम असल्याचं रुग्णालयातील एका डॉक्टरांनी सांगितलं.