Join us  

Salaar BTS Picture: Salaar चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल, अॅक्शन अवतारात दिसणार Prabhas...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 7:11 PM

Salaar BTS Picture: KGFचा दिग्दर्शक प्रशांत नील 'सालार'चे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात प्रभाससह श्रुती हसन, पृथ्वीराज आणि जगपतीबाबूसारखे कलाकार असणार आहेत.

BTS Picture From Prabhas starrer Salaar: 'बाहुबली'च्या अफाट यशानंतर अभिनेता प्रभास (Prabhas) काही खास जादू दाखवू शकला नाही. बाहुबलीनंतर त्याचे सर्वच चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. फ्लॉप असूनही प्रभासची क्रेझ काही कमी झालेली नाही. चाहते त्याच्या आगामी 'आदिपुरुष' आणि 'सालार' (Salaar) चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. यातच चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो व्हायरल झाला आहे.

'केजीएफ'च्या यशानंतर दिग्दर्शक प्रसांत नीलदेखील देशभराच प्रसिद्ध झाला आहे. सालारचे दिग्दर्शन प्रशांत करत असल्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. या वर्षी सालार रिलीज होणार असून, चित्रपटाची शूटिंग मोठ्या थाटामाटात सुरू आहे. चित्रपटाच्या सेटवरील एक फोटोही सध्या व्हायरल होतोय.

सिनेमॅटोग्राफर भूवन गोवाडाने ट्विटरवर चित्रपटाच्या सेटवरील एक कँडिड फोटो शेअर केला आहे. हा फोटो रात्री काढलेला दिसतोय. या फोटोमध्ये एक मोठा लाईट एका क्रेनवर लटकवलेला दिसतोय. फोटो पाहून हा अॅक्शन सीन असण्याचा अंदाज आहे. या फोटोसोबत 'शूट इन प्रोगेस' असे कॅप्शनही दिले आहे. हा फोटो पाहून चाहत्यांच्या अपेक्षा आणखीनच वाढल्या आहेत. चित्रपटात प्रभास एका जबरदस्त अॅक्शन अवतारात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत श्रुती हसन असणार आहे.

चित्रपटाचे अवाढव्य बजेट'सालार'मध्ये प्रशांत नील आणि प्रभास पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. मेकर्स हा चित्रपट अतिशय लार्ज स्केलवर म्हणजेत भव्य-दिव्य बनवत आहेत. होम्बले फिल्म्सअंतर्गत बनत असलेल्या चित्रपटाचे बजेट 400 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. या चित्रपटावर 'केजीएफ'ची क्रिएटिव्ह टीम आणि टेक्निशियन काम करत आहेत. होम्बले फिल्म्सने यापूर्वी 'केजीएफ', 'केजीएफ 2' आणि 'कांतारा'सारखे यशस्वी चित्रपट दिले आहेत. 28 सप्टेंबर 2023 ला 'सालार' (Salaar) 5 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटात प्रभास, श्रुती हसन, पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू, ईश्वरी राव आणि श्रिया रेड्डीसारखे दिग्गज कलाकार आहेत.

टॅग्स :प्रभासबॉलिवूडकेजीएफ