Join us

Prabhas: रजनीकांतसोबतच्या फोटोमुळे प्रभास का होतोय ट्रोल? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 2:53 PM

Prabhas: तूर्तास चर्चा प्रभासच्या सिनेमाची नाही तर त्याच्या एका व्हायरल फोटोची आहे. होय, प्रभासचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि या फोटोमुळे प्रभास जबरदस्त ट्रोल होतोय.

बाहुबली फेम प्रभास (Prabhas) या ना त्या कारणानं सतत चर्चेत असतो.  प्रभासचे दोन नवे सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. सालार आणि आदिपुरूष या चित्रपटांत प्रभास झळकणार आहे. प्रभासचा बाहुबली हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. पण यानंतर आलेला त्याचा एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. साहो आला, तो आपटला. पाठोपाठ आलेला राधेश्याम हा सिनेमाही फ्लॉप गेला. आता प्रभास व त्याच्या चाहत्यांना सालार व आदिपुरूषकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तूर्तास मात्र चर्चा प्रभासच्या सिनेमाची नाही तर त्याच्या एका व्हायरल फोटोची आहे. होय, प्रभासचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि या फोटोमुळे प्रभास जबरदस्त ट्रोल होतोय. फोटोत त्याच्यासोबत रजनीकांत व शिवा राजकुमारही दिसताहेत.

 सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत प्रभास  खूपच लठ्ठ दिसत आहे. अर्थात हा फोटो मॉर्फ केलेला आहे. या फोटोमध्ये प्रभास नसून रजनीकांत आणि शिवा कुमारसोबत कोणीतरी दुसरीच व्यक्ती आहे. या व्यक्तीच्या चेहऱ्यावर  प्रभासचा चेहरा चिकटवण्यात आला आहे.  पण तरिही या फोटोमुळे अनेकजण प्रभासला ट्रोल करत आहेत. 'अरेरे, प्रभासला काय झालं, इतका वाईट...,'असं एकाने लिहिलं आहे. काही युजर्सनी त्याला अंकल म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी प्रभास त्याच्या वाढलेल्या वजनामुळे चर्चेत आला होता. त्याच्या वजनामुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं. ‘राधेश्याम’ या चित्रपटात प्रभास लीन लुकमध्ये दिसला होता. पण प्रमोशनदरम्यान त्याचं अचानक वाढलेलं वजन बघून सगळ्यांना धक्का बसला होता. चर्चा खरी मानाल तर राधेश्याममध्ये सीजीआय टेक्निकच्या मदतीने प्रभासला चांगल्या शेपमध्ये दाखवलं गेलं होतं. 

दरम्यान प्रभास शेवटचा 'राधे श्याम' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याची पूजा हेगडेसोबतची जोडी पाहायला मिळाली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. लवकरच त्याचा 'सालार' हा चित्रपट 'आदिपुरुष' हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

टॅग्स :प्रभासरजनीकांत