सलमान खानच्या 'माय लव'ने घेतला जगाचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 01:00 PM2018-10-19T13:00:59+5:302018-10-19T13:07:22+5:30
सलमान खानचा आवडता डॉगी 'माय लव'चे आज सकाळी निधन झाले आहे. 'माय लव'सलमानच्या परिवारातील एका सदस्यासारखा होता. सलमानने स्वत: ट्विटरवरुन आपल्या डॉगीसोबतचा फोटो शेअर करुन आपलं दु:ख व्यक्त केले आहे.
सलमान खानचा आवडता डॉगी 'माय लव'चे आज सकाळी निधन झाले आहे. 'माय लव' सलमानच्या परिवारातील एका सदस्यासारखा होता. सलमानने स्वत: ट्विटरवरुन आपल्या डॉगीसोबतचा फोटो शेअर करुन आपलं दु:ख व्यक्त केले आहे.
My most beautiful my love gone today. God bless her soul. pic.twitter.com/a7Xdag3Xye
— Salman Khan (@BeingSalmanKhan) October 18, 2018
सलमाने ट्विट करत लिहिले आहे की, माझा सगळ्यात सुंदर 'माय लव'ने आज या जगाचा निरोप घेतला. देव त्याच्या आत्माला शांति देवो. सलमान या फोटो डॉगीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
Kisses my love..... pic.twitter.com/k7bF0JsdFC
— Salman Khan (@BeingSalmanKhan) October 18, 2018
‘माय लव्ह’च्या आधी सलमानकडे 'माय सन' आणि 'माय जान' नावाचे दोन डॉग होते. त्यातल्या मायसनचे 2009 साली निधन झाले त्यानंतर काही महिन्यांनी माय जानचे देखीन निधन झाले.
काही महिन्यांपूर्वी 'रेस3'च्या रिलीज आधी सलमानने आपल्या डॉगीसोबतचा फोटो शेअर केला होता आणि त्याला कॅप्शनदेखील दिले होते. सलमान सध्या भारत सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल.