Join us

'ब्रह्मास्त्र'मधील कलाकारांच्या मानधनात होणार कपात ?, करण जोहरने केला हा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 11:11 AM

सिनेमाचे 40 टक्के शूटिंग अजून बाकी आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाची वाट फॅन्स मोठ्या आतुरतेने बघतायेत. दिग्दर्शक अयान मुखर्जी दिग्दर्शित हा सिनेमा ४ डिसेंबर २०२० ला रिलीज होणार होता. मात्र आता सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. सिनेमाचे 40 टक्के शूटिंग अजून बाकी आहे. लॉकडाऊनमुळे सिनेमाचे शूटिंग सुरु होण्यास उशीर होतो आहे. परिणामी धर्मा प्रॉडक्शनने आलिया-रणबीरचे मानधन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मात्र निर्माता करण जोहरने या सगळ्या चर्चा फेटाळल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे कलाकारांच्या मानधनात कपात करण्यात येणार नाही. करण जोहरने ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी प्रसार माध्यमांमधील माझ्या सर्व मित्रांना विनंती करतो की आमच्या चित्रपटाविषयी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नये. व्यवसायासाठी हा एक आव्हानात्मक काळ आहे आणि खोटी बातमी केवळ परिस्थिती अधिक खराब करते. कोणत्याही विषयाची अधिकृत घोषणा होईपर्यंत थांबा !! ही नम्र विनंती आहे. "

‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात रणबीर कपूरसोबतआलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :करण जोहररणबीर कपूरआलिया भटब्रह्मास्त्र