Join us

अन् सेकंदात तुटली सलीम-जावेद जोडी! सलीम खान यांनी बोलून दाखवले दु:ख!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 16:11 IST

सलीम खान आणि जावेद अख्तर ही जोडी बॉलिवूडच्या सुपरहिट राईटर्सच्या जोडीपैकी एक होती .जावेद अख्तरसोबत मिळून सलीम खान यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिलेत.

ठळक मुद्दे इतक्या वर्षांत सलीम खान आणि जावेद अख्तर दोघेही कधीच यावर बोलताना दिसले नाहीत.

सलीम खान आणि जावेद अख्तर ही जोडी बॉलिवूडच्या सुपरहिट राईटर्सच्या जोडीपैकी एक होती .जावेद अख्तरसोबत मिळून सलीम खान यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिलेत.    जंजीर , दीवार , त्रिशूल , काला पत्थर , मिस्टर इंडिया अशा एकापेक्षा एक हिट   २३ चित्रपटांच्या पटकथा या जोडीने लिहिल्या. त्यामुळेच ही जोडी तुटली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. इतक्या वर्षांत सलीम खान आणि जावेद अख्तर दोघेही कधीच यावर बोलताना दिसले नाहीत.

पण अलीकडे नीलेश मिश्राचा चॅट शो ‘स्लो इंटरव्ह्यू’मध्ये सलीम खान यावर बोलले. त्यांनी सांगितले की, एकदिवस जावेद आले आणि त्यांनी मला वेगळे व्हायचेय, असे सांगितले. त्यांचे ते शब्द ऐकून मला धक्का बसला. आमच्या विभक्त होण्याचे कारण अपयश, पैसा असते तर फार काही वाटले नसते. पण असेच अगदी अचानक  चल, आता आपण वेगळे होऊ, असा विचार करणे प्रचंड वेदनादायी होते.

आमची जोडी उभी करण्यासाठी मी खूप वेळ दिला होता. आमच्या जोडीचे इंडस्ट्रीत एक नाव होते. एक वेगळा दबदबा होता. आमच्या नावावर चांगले पैसे मिळायचे. पण हे सगळे काही सेकंदात संपुष्टात आले. आमचे शेवटचे काही चित्रपट फ्लॉप होऊ लागले होते. पण यावरून आमच्यात कधीच वाद झाला नाही. पण आता मी या सगळ्यांतून बाहेर आलो आहे.सलीम खान यावेळी मुलगा सलमान खान याच्याबद्दलही बोलले. सलमान हा पहिला सुपरस्टार असेल जो एका लहानशा फ्लॅटमध्ये राहतो. ‘जंजीर’चित्रपट हिट झाल्यानंतर मी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहायला आलो होतो. तेव्हापासून मी इथेच राहतोय आणि माझ्यामुळे सलमान हे घर सोडायला तयार नाही, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :सलीम खानजावेद अख्तरसलमान खान