Join us

"चक दे इंडिया" गाणे कसे तयार झाले, सलीम सुलेमान यांनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 3:01 PM

''चक दे .... चक दे इंडिया'' कोणताही विजय प्रसंग असला तरी, या गाण्यातून सामान्य माणसाच्या भावना सुंदरपणे व्यक्त होतात. हे गाणे फक्त प्रेरणादायीच नाही, तर थेट मनाला भिडणारे आहे.

शाहरूख खान स्टारर ‘चक दे इंडिया’ हा सिनेमाच्या आठवणी आजही  रसिकांच्या मनात घर करुन आहेत. आज या सिनेमाने १४ वर्ष पूर्ण केली आहेत.तरिही या चित्रपटाच्या आठवणी ताज्या आहेत. २००७ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. शिमित अमीन दिग्दर्शित या सिनेमात शाहरुख खान, विद्या माळवदे, सागरिका घाटगे यांच्या मुख्य  भूमिका होत्या.तर  कबीर खान नावाच्या भारतीय हॉकी संघाच्या माजी कर्णधाराची भूमिका शाहरूख खानने मोठ्या खुबीने साकारली होती.सिनेमाच्या दमदार कथा आणि तितक्याच दमदार गाण्यानेही रसिकांची पसंती मिळवली. सिनेमा प्रदर्शित होऊन इतके वर्ष झाले तरी सिनेमाचे गाणे मात्र आजही तितकेच सुपरहिट आहे. 

''चक दे .... चक दे इंडिया'' कोणताही विजय प्रसंग असला तरी, या गाण्यातून सामान्य माणसाच्या भावना सुंदरपणे व्यक्त होतात. हे गाणे फक्त प्रेरणादायीच नाही, तर थेट  मनाला भिडणारे आहे. हे गाणे कसे तयार झाले याबद्दल सुलेमानने सांगितले होते की,, “त्याची सुरुवात म्हणजे, खुद्द चित्रपटाचे नावच होते- चक दे! इंडिया.

 

आम्ही जेव्हा पटकथा ऐकली, तेव्हा आम्हाला हे प्रकर्षाने जाणवले की या टायटल गाणे असे असावे ज्यात एका सळसळत्या देशभक्ती गीताची आवश्यकता आहे. त्यामुळे आम्ही अशा एका गीतावर काम करू लागलो, ज्यात खूप मोठा अर्थ असेल, पण चित्रपटाच्या निर्मात्यांना ते आवडले नाही. त्याला वाटले, की ते गीत चित्रपटात चपखल बसत नाही आहे. त्यामुळे आम्ही त्या गीताच्या खूप वेगवेगळ्या, सुमारे 7-8 चाली बनवल्या.”

सलीम म्हणाले की, “आम्ही दुसर्‍यांदा जे गाणे तयार केले होते, ते खूप दमदार होते. त्याचा ठेकाही मस्त होता.. पण त्यात आत्मा हरवत होता. त्यानंतरच्या अनेक चाली नाकारल्या गेल्या. त्यानंतर मी सुलेमानला म्हटले की आपण हा चित्रपटच करायला नको. मला वाटले की, जर आपण आपल्या गीतांद्वारे या चित्रपटाला न्याय देऊ शकत नसू, तर हा चित्रपटच न करणे चांगले. त्यावेळी मला सुलेमानने सांगितले की, ‘कोशिश करते हैं, कुछ करते हैं.. कुछ करते हैं... आणि अशा प्रकारे, ‘कुछ करिये... कुछ करिये’ सापडले. त्यानंतर आम्ही तत्काळ जयदीप साहनींना भेटलो, जे या चित्रपटाचे लेखक आहेत. त्यांनी आम्हाला “कुछ करिये... कुछ करिये... नस नस मेरी खोले” तयार करण्यात मदत केली आणि मग जे घडले तो इतिहास आहे.हे एक गीतच नाही तर ही भावना आहे, जी फक्त लोकांना प्रेरणा देत नाही, तर त्यांच्याच अभिमानाची भावना भरते. 

टॅग्स :शाहरुख खानसलीम मर्चंट