Join us

एकता कपूरवर का नाराज आहे सलमान अन् सोहेल खान?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 8:49 AM

सलमान खान आणि सोहेल खान हे दोघे भाऊ सध्या एकता कपूरवर नाराज असल्याचे कळतेय. होय, ‘मेंटल’ या शीर्षकावरून सलमान ...

सलमान खान आणि सोहेल खान हे दोघे भाऊ सध्या एकता कपूरवर नाराज असल्याचे कळतेय. होय, ‘मेंटल’ या शीर्षकावरून सलमान व सोहेल एकतावर नाराज आहेत. एकता कपूर निर्मित ‘मेंटल है क्या’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात कंगना राणौत आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत. नेमक्या या चित्रपटातील ‘मेंटल’ हा शब्द ‘खान’ बंधूंच्या नाराजीचे कारण ठरला आहे. एकताने आपल्या चित्रपटाच्या शीर्षकात हा शब्द वापरणे  ‘खान’ बंधूंना खटकले आहे.  एकता कपूरने आपल्या या आगामी सिनेमाची तयारी सुरु केली तेव्हा तिने त्यासाठी ‘मेंटल’ हे नाव पसंत केले होते. पुढे  हे नाव रजिस्टर करण्याची प्रक्रिया एकताने सुरु केली आणि हे टायटल आधीच रजिस्टर असल्याचे तिला कळले. जरा माहिती काढल्यावर सलमान खानने हे टायटल रजिस्टर केल्याचे त्यांना समजले. तुम्हाला ठाऊक नसेल पण सलमानच्या अलीकडे आलेल्या ‘ट्यूबलाईट’साठी सर्वप्रथम ‘मेंटल’ हेच नाव ठरले होते. या चित्रपटाचे रजिस्ट्रेशनही याच नावाने करण्यात आले होते. पण नंतर ऐनवेळी ‘ट्यूबलाईट’हे नाव निश्चित करण्यात आले होते. आता सलमानकडून हे टायटल घ्यायचे म्हटल्यावर तशी परवानगी हवीच. त्यानुसार, एकताची टीम  या टायटलसाठी भाईजानला भेटणार  होती, अशी बातमीही आली होती. पण कदाचित ही भेट झालीच नाही. होय, कारण या भेटीआधीच एकताने आपल्या चित्रपटाचे नाव ‘मेंटल’ऐवजी ‘मेंटल है क्या’ असे करून घेतले. तसे तिने ते जाहीरही केले. अलीकडे सोहेलला याबद्दल विचारले असता त्याने याबद्दलची नाराजी अगदी स्पष्टपणे बोलून दाखवली. तुम्ही एकताला ‘मेंटल’ हा शब्द तिच्या टायटलमध्ये वापरण्याची परवानगी दिली का? असा प्रश्न सोहेलला केला गेला. यावर, नाही, अजिबात नाही. आम्ही एकताना ‘मेंटल’ हे टायटल दिलेले नाही. ते वापरण्याआधी तिने आम्हाला विचारले देखील नाही, असे सोहेल म्हणाला.  ALSO READ : ​​कंगना राणौत म्हणते, लोक मला ‘सायको’ म्हणायचे, ‘या’ चित्रपटाने दूर होईल त्यांचा गैरसमज!