Join us  

सलमान बोहल्यावर चढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2016 1:50 PM

बॉलिवुडमधला मोस्ट एलिजेबल बॅचलर सलमान खान लग्न करणार असल्याची चर्चा आहे. सलमान रोमिअन अभिनेत्री लुलिया व्हँटर याच्यासोबत नात्यात असल्याचे ...

बॉलिवुडमधला मोस्ट एलिजेबल बॅचलर सलमान खान लग्न करणार असल्याची चर्चा आहे. सलमान रोमिअन अभिनेत्री लुलिया व्हँटर याच्यासोबत नात्यात असल्याचे कित्येक दिवसांपासून म्हटले जात आहे. आता या वर्षाच्या अखेरीस तो तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे. सलमानची आई सध्या सतत आजारी असते. त्यामुळे सलमान आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. पण खरेच सलमान लग्न करतो की नेहमीप्रमाणे ही देखील अफवाच ठरते हे येणारा काळच ठरवेल.