बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानने (Salman Khan) कालच आपला वाढदिवस साजरा केला. सलमानने सुमारे 34 वर्षांपूर्वी बॉलिवूड डेब्यू केला होता आणि आज 34 वर्षानंतरही त्याची डिमांड कमी झालेली नाही. प्रत्येक निर्माता-दिग्दर्शक त्याच्यासोबत काम करायला उत्सुक आहे. पण एक काळ असा नव्हता. होय, एकेकाळी सर्वांसाठीच सलमान फ्लॉप अॅक्टर होता. त्याच्यासमोर काम करायलाही कोणी राजी नव्हतं. खरं तर ‘मैंने प्यार किया’ सुपरहिट झाला होता. पण याचं सगळं क्रेडिट भाग्यश्रीच्या झोळीत पडलं होतं आणि सलमानला चित्रपटानंतर सहा महिने घरी रिकामा बसावं लागलं होतं. ‘मैंने प्यार किया’ सुपरडुपर हिट झाल्यावर सलमानने आपल्या चाहत्यांच्यासाठी एक खुलं पत्र लिहिलं होतं. 1990 साली लिहिलेलं हे पत्र आज 32 वर्षानंतर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. सध्या त्याचीच चर्चा आहे. सलमानने स्वत: त्याच्या हाताने हे पत्र लिहिलं होतं. काय होतं त्या पत्रात...?
सलमानचं पत्र...
सलमानने त्या पत्रात लिहिलं होतं, ‘मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना काही सांगू इच्छितो. सर्वप्रथम तुम्ही माझे चाहते आहात यासाठी मी तुमचे आभार मानू इच्छितो. मी एका चांगल्या स्क्रिप्टवर काम करतोय. मी हे का सांगतोय? कारण मला माहितीये, यापुढे मी जे काही काम करणार, त्याची तुलना मैंने प्यार किया सोबत केली जाईल. माझ्या कुठल्याही सिनेमाची घोषणा ऐकाल, तेव्हा हा विश्वास कायम असू द्या की, तो एक चांगला सिनेमा असेल. मी त्यात माझं 100 टक्के देईल. मी तुम्हा सगळ्या चाहत्यांवर खूप प्रेम करतो. तुम्ही माझ्यावर असंच प्रेम करत राहाल, अशीही आशा करतो. ज्यादिवशी तुम्ही माझ्यावर प्रेम करणं बदं कराल, त्यादिवशी तुम्हाला माझे सिनेमे दिसणंही बंद होईल आणि तो माझ्या करिअरचा दी एंड असेल. पर्सनल लाईफबद्दल म्हणाल तर मला फार काही बोलायची गरज नाही. तुम्हाला सगळं आधीच ठाऊक आहे. मी स्वत:ची ओळख बनवली, असं लोक म्हणतात. पण मला असं वाटत नाही. अद्याप ती उंची गाठणं बाकी आहे. पण एक गोष्ट मला चांगलीच ठाऊक आहे, ती म्हणजे, मला तुम्ही स्वीकारलं आहे...’
सलमान 1988 साली ‘बीवी हो तो ऐसी’मध्ये सपोर्टिंग रोलमध्ये दिसला होता. यानंतर 1989 साली ‘मैंने प्यार किया’मध्ये तो लीड हिरो होता.