Join us

'या' अभिनेत्रीसोबत काम करायला घाबरायचा सलमान खान ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 5:58 AM

80 ते 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीने काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या मॉम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले. ...

80 ते 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीने काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या मॉम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले. याचित्रपटात तिने आई आणि शिक्षकेची भूमिका साकारली होती. श्रीदेवी बॉलिवूडमधल्या काही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट्स दिले आहेत. तिने एनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे.  जितेंद्र यांच्या हिम्मतवाला चित्रपटातनंतर श्रीदेवी प्रकाशझोतात आली. आपल्या अभिनयासाठी 80 ते 90 च्या  दशकात 1 कोटींचे मानधन घेणारी ती सगळ्यात पहिली अभिनेत्री होती. पण तुम्हाला हे माहिती आहे का दबंग सलमान खान श्रीदेवीला घाबरतो ?  एक जमान्यात श्रीदेवीसोबत काम करणाऱ्या अभिनेत्याकडे प्रेक्षकांचा फारसे लक्ष जायचे नाही. श्रीदेवीला घेऊन अशी चर्चा होती की ती ज्या चित्रपटात काम करायची त्यात हिरोला फारसा भाव मिळायचा नाही. 80 ते 90 च्या दशकात श्रीदेवीची ऐवढी जादू होती की फक्त अभिनेत्री नाही तर अभिनेतेसुद्धा एनसिक्योर फील करायचे. ALSO READ :  सलमान खान आणि भाचा आहिलचा ‘हा’ फोटो बघून चाहत्यांनी सल्लू मामाला दिला लग्नाचा सल्ला!!एक अॅवॉर्ड शो दरम्यान  नुकतेच अभिनेता सलमान खान आणि श्रीदेवी एकत्र आले होते. त्यावेळी सलमान म्हणाला की,  आमिर खान, शाहरुख खान, मी आणि अक्षय कुमारनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. आमिरने आतापर्यंत 50 चित्रपट केले आहेत, शाहरुख खानने 100 आम्ही सगळ्यांनी जवळपास 205 ते 270 चित्रपट केले आहे. मात्र श्रीदेवी हा अशी एक अभिनेत्री आहे जिने जवळपास 300 चित्रपटात काम केले आहे. श्रीदेवी बालकलाकार म्हणून या इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली.श्रीदेवीने सलमनाचे धन्यवाद केले  तसेच सलमानच्या आईने श्रीदेवीला या क्षेत्रात केलेल्या मदतीबाबत आभार मानले. तसेच सलमनाने एक इंटव्ह्यु दरम्यान सांगितले होते की ज्या चित्रपटात श्रीदेवी असायची त्याच चित्रपटातील दुसऱ्या कलाकारांना प्रेक्षक इग्नोर करायचे. त्यांच्या डोक्यात फक्त श्रीदेवी असायची. सलमानने 90 च्या दशकात आलेल्या चाँद का तुकडा आणि चंद्रमुखी चित्रपटात काम केले होते.