Join us  

Viral Video: “पैसा काय काय करायला लावतो यार...”, सलमान-अक्षयचा व्हिडीओ पाहून चाहते नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 4:30 PM

Salman Khan Akshay Kumar Viral Video: सलमान खान आणि अक्षय कुमार दोघांना एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि हाच व्हिडीओ त्यांच्या ट्रोलिंगचं कारण ठरला आहे.

Salman Khan Akshay Kumar Viral Video: बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खान आणि 'खिलाडी' अक्षय कुमार सतत या ना त्या कारणानं चर्चेत असतात. अक्षय सध्या सेल्फी या आपल्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. तर सलमान टायगर ३ मुळे हेडलाईन्समध्ये आहे. तूर्तास या दोघांना एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि हाच व्हिडीओ त्यांच्या ट्रोलिंगचं कारण ठरला आहे. होय, या व्हिडीओमुळे सलमान व अक्षय दोघंही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. आता या व्हिडीओत असं काय आहे तर व्हिडीओ एका लग्नातला आहे.

होय, दिल्लीतल्या एका शाही लग्नात अक्षय व सलमान दोघांनी परफॉर्मन्स दिला. मनीष पॉलने हा इव्हेंट होस्ट केला. या लग्नसोहळ्यात अक्षय व सलमान दोघांनीही आपआपल्या गाण्यांवर धम्माल डान्स करत वऱ्हाड्यांचं मनोरंजन केलं. वऱ्हाडी तर खुश्श झालेत. पण नेटकऱ्यांना सलमान व अक्षयने असं लग्नात नाचणं आवडलं नाही. मग काय अनेकांनी दोघांना ट्रोल केलं. सोशल मीडियावर अनेकांनी अभिनेत्यांची खिल्ली उडवली.

'पैशासाठी काय काय करावलं लागतं यांना', असं एका युजरने लिहिलं. 'पैशांसाठी कसे नाचतायत बघा..', अशा शब्दांत एका युजरने दोघांना ट्रोल केलं. 'हे म्हातारे आपल्या थडग्यावर सुद्धा नाचतील', असं एका युजरने लिहिलं. 'लग्नात नाचून हे लोक आपली प्रतीमा खराब करत आहेत. चित्रपट आणि जाहिरातीतून मिळणारा पैसा पुरेसा नाही का', असा सवाल एका युजरने केला. 'पैशानं सगळं करवून घेतलं जाऊ शकतं', असं एका युजरने लिहिलं. 

टॅग्स :सलमान खानअक्षय कुमारबॉलिवूड