Join us

बॉक्स ऑफिसवर सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन येणार आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 9:08 AM

ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खानची जोडी पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र बघायला कुणाला नाही आवडणार. संजय लीला भन्साळींनी असाच ...

ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खानची जोडी पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र बघायला कुणाला नाही आवडणार. संजय लीला भन्साळींनी असाच प्रयत्न हम दिल दै चुके सनम चित्रपटानंतर केला होता. पद्मावतीसाठी  त्यांना ऐश्वर्या आणि अभिषेकाल घ्यायचे होते. मात्र भूमिकेवरुन त्यांच्यात मतभेद झाले आणि सगळे फिसकटले. आता या दोघांच्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर सामना होणार आहे. दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर सल्लू मियाँ आपल्या फॅन्सना ईदी म्हणून रेस 3 घेऊन येतो आहे. तर त्याचवेळेस ऐश्वर्या राय बच्चनचा फन्ने खानही चित्रपटगृहात रिलीज होणार असल्याची माहिती मिळते आहे. फन्ने खानच्या निर्मात्यांने मिड-डे ला दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले की, आम्ही फन्ने खानला पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी रिलीज करणार आहोत. ईदच्या दिवशी हा चित्रपट रिलीज करण्यामागचे कारण म्हणजे याचित्रपटातील मुख्य भूमिका साकारत असलेला फन्ने खान म्हणजेच अनिल कपूर मुस्लीमधर्मीय आहे. त्यामुळे चित्रपट रिलीज करण्यासाठी यापेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस असू शकत नाही.    फन्ने खानमध्ये ऐश्वर्या रायच्या एका रॉकस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात 3 गाणी ऐश्वर्यावर चित्रीत करण्यात आली आहेत.  चित्रपटाच्या सुरुवातीलाच ऐश्वर्याची एंट्री एका डान्स साँगसोबत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्रेजी किया रे असे आहेत. यानंतर दुसऱ्या गाण्यात ऐश्वर्या अभिनेता राजकुमार रावसोबत रोमांस करताना दिसणार आहे. ज्याची शूटिंग मुंबईत होणार आहे, तर तिसऱ्या गाण्यात ऐश्वर्या चित्रपटातील मुख्य अभिनेता अनिल कपूरसोबत दिसणार आहे. हे एक इमोशन गाणं असेल. 'रेस 3' मध्ये सलमान खान सोबत जॅकलिन फर्नांडिस, डेजी शहा आणि बॉबी देओल या चित्रपटात असणार आहे. हा रेस सीरिजचा तिसरा भाग आहे. आतापर्यंत आलेल्या रेसच्या दोन चित्रपट सैफ अली खान होता आता त्याची जाग सलमान खानने घेतली आहे. बॉबी देओलचा रोल याआधी सिद्धार्थ मल्होत्राला ऑफर करण्यात आला होता मात्र त्याच्या अपोझिट चित्रपटात डेजी शहा असल्याचे कळल्यावर त्यांने चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. ALSO READ :  २०० कोटी कमावले तरीही फ्लॉप म्हणूनच गणल्या जाईल ‘टायगर जिंदा है’! वाचा कारण!!