Join us

Aishwarya Rai : करिनाने होकार दिला असता तर कदाचित ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमानची एन्ट्री झाली नसती....!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 5:20 PM

Aishwarya Rai : आपल्या सौंदर्यानं सर्वांना घायाळ करणारी ऐश्वर्या राय आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा करतेय. ऐश्वर्या म्हटलं की, तिच्या आयुष्यातील एका अधुऱ्या प्रेमकथेचा उल्लेख हटकून होतोच...

Aishwarya Rai Birthday: आपल्या सौंदर्यानं सर्वांना घायाळ करणारी ऐश्वर्या राय  (Aishwarya Rai) आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा करतेय. ऐश्वर्या म्हटलं की, तिच्या आयुष्यातील एका अधुऱ्या प्रेमकथेचा उल्लेख हटकून होतोच. होय, सलमान खान  (Salman Khan)आणि ऐश्वर्या या दोघांच्या लव्हस्टोरीचे अनेक किस्से आजही इतक्या वर्षानंतरही चवीने वाचले जातात.1994 साली मिस वर्ल्डचा खिताब जिंकल्यानंतर सगळीकडे ऐश्वर्याच्या सौंदर्याची चर्चा होती. पण बॉलिवूडमध्ये ती आली आणि तिलाही टीका सहन कराची लागली. ‘और प्यार हो गया’ हा तिचा पहिला सिनेमा. ऐशचा पहिलाच सिनेमा फ्लॉप गेला. तिची अ‍ॅक्टिंग पाहून अनेकांनी तिला नको ते ऐकवलं. जगत्सुंदरी म्हणून मिरवणं एक गोष्ट आणि अभिनय करणं ही दुसरी गोष्टी, असं तिच्याबद्दल म्हटलं गेलं. यानंतर 1999 मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ आला आणि सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला.

या सिनेमाने ऐश्वर्याला खऱ्या अर्थाने ओळख दिली. यात ऐश्वर्याचा हिरो होता सलमान खान. ऐश्वर्या दीर्घकाळापासून एका ब्लॉकबस्टर सिनेमाच्या प्रतीक्षेत होती. ‘हम दिल दे चुके सनम’ने तिच्या हवं ते यश मिळवून दिलं. शिवाय सलमानच्या रूपात तिला तिचं प्रेमही मिळालं. या चित्रपटातील सलमान व ऐश्वर्याची रोमॅन्टिक केमिस्ट्री जितकी खास होती, तितकीच रिअल लाईफमध्येही होती. पण तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल की, करिना कपूर असती तर कदाचित ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमानची एन्ट्री झाली नसती....!

होय, ऐकून आश्चर्य वाटेल पण ‘हम दिल दे चुके सनम’  या सिनेमासाठी करिना कपूर ही संजय लीला भन्साळींची पहिली पसंत होती. या चित्रपटात सलमानच्या अपोझिट त्यांना करिना हवी होती. पण करिनाने हा सिनेमा करायला नकार दिला. सलमान व तिच्या वयात खूप फरक होता, ही जोडी कशी दिसेल अशी चिंता करिनाला होती. त्यामुळेच विदेशात शिकायला जातेय, असं सांगून तिने नकार कळवला. करिनाने नकार दिल्यावर ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये ऐश्वर्याची एन्ट्री झाली. करिनाने या चित्रपटाला होकार दिला असता  तर कदाचित सलमान व ऐश्वर्याची लव्हस्टोरी सुरू झाली नसती... कदाचित चित्र काही वेगळं असतं. शिवाय ऐश्वर्याला  एक ब्लॉकबस्टर सिनेमाही मिळाला नसता....

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनसलमान खानकरिना कपूरबॉलिवूड