बॉलिवूडमध्ये सध्या जिकडे तिकडे भाईचारा दिसत आहे. कोरोनानंतर आलेला डाऊनफॉल भरुन काढण्यासाठी आता सर्वच कलाकार एकमेकांना प्रमोट करताना दिसत आहेत. नुकतंच सनी देओलने 'गदर 2'सारखा ब्लॉकबस्टर हिट दिला. तर आता सनीचा मुलगा राजवीर देओलने (Rajveer Deol) अभिनयात पदार्पण केलंय. त्याच्या 'दोनो' या सिनेमाचं काल स्क्रीनिंग झालं. या स्क्रीनिंगला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
'दोनो' या सिनेमातून राजवीर देओल आणि पूनम ढिल्लो यांची मुलगी पलोमाने पदार्पण केलंय. तर सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीश बडजात्याने यातून दिग्दर्शनात पदार्पण केलंय. त्यामुळे दोनो हा सिनेमा स्टारकिड्सचाच आहे. सिनेमाची स्क्रीनिंग काल मुंबईत पार पडली. यावेळी सलमान खान (Salman Khan) आणि आमिर खान (Amir Khan) दोघांची गळाभेट झाली. सलमान खान ब्लॅक पँट आणि शर्टमध्ये कूल अंदाजात दिसला तर आमिर खानचा सुद्धा नवा लुक दिसला. या दोघांना एकत्र बघून चाहत्यांना 'अंदाज अपना अपना' चे दिवस आठवले.
यावेळी आमिर खानसोबत त्याचा मुलगा जुनैद खानही होता. जुनैद देखील लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारित आहे. त्यानेही सलमानची गळाभेट घेतली. आमिर-सलमानची जोडी ९० च्या काळात हिट झाली होती. 1994 साली आलेल्या 'अंदाज अपना अपना' मध्ये त्यांनी धमाल आणली होती. त्यांच्या विनोदी भूमिकेने सर्वांनाच हसवले.या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टचीही चर्चा जोर धरुन होती.