बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katria Kaif) काही दिवताच लग्न बंधनात अडकणार आहेत. पण दोघांनी यावर अजून काहीच अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण लग्नाची बातमी दिवसेंदिवस पक्की होत आहे. सोशल मीडियावर लग्नाच्या व्हेन्यूपासून ते लग्नातील कठोर नियम याबाबत चर्चा होत आहे.
इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार, कतरिना कैफनेसलमान खान (Salman Khan) आणि त्याच्या परिवाराला जयपूरमध्ये (Jaipur) होत असलेल्या लग्नासाठी निमंत्रण दिलं आहे. असं सांगितलं जात आहे की, कतरिनाने सलमान आणि त्याच्या बहिणींना फॉर्मल इन्व्हाइट पाठवलं आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान खान, अर्पिता खान आणि अलवीरा खान अग्निहोत्री कतरिना कैफच्या लग्नात सहभागी होणार आहेत.
अर्पिताने दिलं उत्तर
अर्पिता खानचा कॉन्टॅक्ट केल्यावर तिने या बातमीवर विराम लावताना सांगितलं की, अजूनपर्यंत तिला लग्नाचं कोणतंही निमंत्रण मिळालेलं नाही आणि ती लग्नाला जाणार नाही. परिवाराशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, सलमान खानच्या परिवाराला कोणतंही निमंत्रण मिळालेलं नाही. कतरिनाच्या लग्नाची पत्रिका अर्पिता आणि अलवीराला सुद्धा मिळालेलं नाही. सगळे लग्नाला जातील ही बातमी फेक आहे.
सलमान खान आणि कतरिना कैफ येणाऱ्या 'टायगर 3' या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. दोघांचं प्रोफेशनल आणि वर्किंग रिलेशन राहिलं आहे. इनसायडरनुसार, सलमान खान कतरिना पसंत करतो आणि तो तिच्याबाबत फार प्रोटेक्टिवही आहे. लग्नानंतर दोघेही एकत्र काम करतील. दोघेही प्रोफेशनल आहेत.