भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) वाढदिवसाच्या पार्टीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. सर्वाधिक व्हायरल झाला तो सल्लू भाई व जेनेलिया डिसूजा (Genelia D’Souza ) यांच्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ. होय, सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीला रितेश देशमुख व जेनेलिया दोघेही हजर होते. पार्टी रंगात आली आणि जेनेलिया व सलमान यांनी चांगलाच ठेका ठरला. सलमानसोबतचा डान्स करतानाचा व्हिडीओ जेनेलियाने स्वत: तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आणि तो क्षणात व्हायरल झाला.या व्हिडीओत सलमान आणि जेनेलिया झिंगाट डान्स करताना दिसले. आता या व्हिडीओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया तर उमटणारच.
2 दिवसांत 59 लाखांवर लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि कमेंट्सचा तर जणू पूर आला. काहींना सलमान व जेनेलियाचा हा झिंगाट डान्स व्हिडीओ प्रचंड आवडला. पण काहींनी तो पाहून नाकं मुरडलीत. होय, काहींनी यावरून जेनेलियाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
एका युजरने तर या डान्स व्हिडीओवर भलीमोठी कमेंट केली. त्याच्या या कमेंटच सध्या चर्चा आहे. ‘ वहिनीसाहेब तुम्ही आमचे आराध्यदैवत कै. विलासराव देशमुख यांच्या सुनबाई आहात. तुम्हाला अशा देशद्रोही आणि समाजकंठक लोकांपासून दूर राहायला पाहिजे. तुम्ही अशा व्यक्तीसोबत नाचत आहात ज्याच्यासोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येत अभिनेत्रीचं नाव बदनाम झालेले आहे. पण आज हा व्हिडीओ बघून खरच खूप वाईट वाटलं. विचार करा साहेब असते तर त्यांनी आज काय विचार केला असता. वाईट वाटत असेल तर क्षमस्व,’ असं या चाहत्याने लिहिलं. ‘हा वेड्यांसारखा डान्स कशासाठी?,’ अशी एक कमेंट अन्य एका युजरने केली. ‘कंट्रोल यार’, अशा शब्दांत एका युजरने या व्हिडीओवर आपली नाराजी व्यक्त केली. अर्थात या व्हिडीओचं कौतुक करणारेही असंख्य आहेत.