Join us

सलमान खान आणि भाचा आहिलचा ‘हा’ फोटो बघून चाहत्यांनी सल्लू मामाला दिला लग्नाचा सल्ला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 11:44 AM

बॉलिवूडचा मोस्ट बॅचलर सलमान खान याला लहान मुलांविषयी प्रचंड जवळिकता आणि आपुलकी आहे. लहान मुले दिसली की, सलमानही लहान ...

बॉलिवूडचा मोस्ट बॅचलर सलमान खान याला लहान मुलांविषयी प्रचंड जवळिकता आणि आपुलकी आहे. लहान मुले दिसली की, सलमानही लहान होऊन त्यांच्यात असा काही रमतो की बघणारे दंग राहतात. आता हेच बघा ना सलमानने त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा हंै’च्या शूटिंगमधून काहीकाळ ब्रेक घेतला आहे. या ब्रेकदरम्यान तो अधिकाधिक वेळ भाचा आहिलला देत आहे. आहिलला सुुरुवातीपासूनच मामा सलमानची कंपनी आवडत असल्याने तोही मामासोबत चांगलाच रमत आहे. विशेष म्हणजे मामा-भाच्याचा मस्तीचा हा अंदाज त्यांच्या चाहत्यांनाही चांगलाच भावत असल्याने मामा-भाच्याची ही जोडी सध्या सोशल मीडियावर धूम उडवून देताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सलमान आणि आहिलचा एक क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये आहिल मामा सलमानची फिरकी घेताना दिसत होता. आता या दोघांचा पुन्हा एक फोटो समोर येत असून, हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. फोटोमध्ये सलमान आहिलला बॉटलने दूध पाझताना दिसत आहे, तर आहिलही मस्तीच्या मुडमध्येच मामू सलमानच्या हातून दूध पितांना दिसत आहे. आहिलला दूध पाझताना सलमान झोपलेला आहे. दोघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो बघून असे वाटत आहे की, मामू सलमानला अगोदर आहिलच्या मागे चांगलेच पळावे लागले असेल. जेव्हा आहिल त्याच्या हाती लागला असेल तर थकून सलमान झोपून त्याला बॉटलने दूध पाझत असेल. मात्र अशातही आहिलचा मुड फ्रेश असल्याचे फोटोत दिसून येत आहे. या अगोदरही सलमान आणि आहिलचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु हा फोटो खूप खास असून, त्यात सलमानचा अंदाज बघण्यासारखा आहे. दरम्यान, सलमानचा हा फोटो बघून त्याच्या चाहत्यांकडून त्यास प्रचंड कॉमेण्ट आणि लाइक्स मिळत आहेत. अनेकांनी कॉमेण्ट देताना सलमान मुलांचा सांभाळ खूप चांगल्या पद्धतीने करतो, त्यामुळे त्याने लवकर लग्न करायला हवे, असा त्याला सल्ला दिला आहे. कारण ज्या पद्धतीने सलमान आहिलचा सांभाळ करतो, त्यावरून त्याला या कामासाठी बहीण अर्पिताची फारशी गरज भासत असेल असे दिसत नाही.