सलमान खान व कॅटरिना कैफ आपल्या जुन्या रिलेशनशिपला देणार का दुसरी संधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2017 10:02 AM
सलमान खान व कॅटरिना कैफ दोघेही सध्या ‘टायगर जिंदा है’च्या सेटवर आहेत. निश्चितपणे पुन्हा एकदा कॅट व सलमानचा आॅनस्क्रीन ...
सलमान खान व कॅटरिना कैफ दोघेही सध्या ‘टायगर जिंदा है’च्या सेटवर आहेत. निश्चितपणे पुन्हा एकदा कॅट व सलमानचा आॅनस्क्रीन रोमान्स पाहायला मिळणार म्हणून चाहते खूश आहेत. केवळ इतकेच नाही तर या दोघांचा आॅनस्क्रीन रोमान्स लवकरात लवकर रिअल लाईफ रोमान्समध्ये बदलावा, अशीही चाहत्यांची इच्छा आहे. विशेष म्हणजे, चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होण्याचीही चिन्हे दिसू लागली आहेत. होय, गेल्या काही दिवसांत सलमान व कॅटरिनाचे एकमेकांसोबतचे वागणे पाहून तरी हेच वाटतेय.तुम्हाला आठवत असेल तर यंदा आयफा अवार्ड सोहळा आठवा. या सोहळ्यात आयफाच्या स्टेजवर सर्वाधिक कॅट अन् सलमानचाच जलवा होता. केवळ जलवा नाही तर दोघांचीही केमिस्ट्रीही बघण्यासारखी होती. सलमानने खास तिला आयफाच्या स्टेजवरून कॅटला बर्थ डे विश केले होते. केवळ इतकेच नाही तर तिच्यासाठी गाणेही गायले होते.ALSO READ : २९ वर्षांपूर्वी स्वत:ला दिलेले एक वचन सलमान खान आजपर्यंत पाळतोय!!यानंतर गत महिन्यात मुंबईत एका इव्हेंटमध्ये सलमान व कॅटरिना सोबत दिसले होते. आतली खबर सांगायची तर सलमान कॅट आहे म्हणून तर कॅटने सलमान आहे म्हणून, या इव्हेंटला होकार दिला होता. त्याआधी मेहबूब स्टुडिओत सलमान कॅटला तिच्या कारपर्यंत सोडायला गेला होता. कॅट व सलमान आपल्या नात्याला पुन्हा एक चान्स देऊ इच्छित आहेत, हेच यावरून दिसते. अलीकडे सलमान व कॅटची रंगू लागलेली केमिस्ट्री तरी हेच सांगतेय.कॅट व सलमान रिलेशनशिपमध्ये होते, हे तुम्हाला ठाऊक आहेच. पण कालांतराने त्यांचे ब्रेकअप झाले. आता हे कपल पुन्हा एकदा जवळ येऊ पाहत असेल तर चाहत्यांना आणखी काय हवे? होय ना?