‘रेस 3’ फ्लॉप झाल्यानंतर सलमान खानचा ‘भारत’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. साहजिकच या चित्रपटाकडून सलमानला प्रचंड अपेक्षा आहे. ‘सुल्तान’ आणि ‘टायगर जिंदा है’नंतर सलमान पुन्हा एकदा त्याचा आवडता दिग्दर्शक अली अब्बास जफरसोबत काम करतोय. ‘भारत’ हा चित्रपट एका गाजलेल्या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. भारत-पाक फाळणीच्या पार्श्वभूमीवरच्या या चित्रपटात कतरीना कैफ, दिशा पाटणी, तब्बू असे अनेक दिग्गज कलाकार आहेत. याशिवाय आणखी एक दमदार कलाकार यात दिसणार आहे. तो म्हणजे, सुनील ग्रोव्हर.
खरे तर कॉमेडियन अशीच सुनील ग्रोव्हरची ओळख राहिली आहे. पण कदाचित लोकांसाठी. सलमान आणि कतरीना या दोघांसाठी तर तो ‘गुरू’ आहे.तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण अलीकडे ‘भारत’च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये सलमान व कतरीना सुनील ग्रोव्हरबद्दल भरभरून बोलले. सुनील ग्रोव्हर एक अतिशय प्रतिभावान अभिनेता आहे. तो केवळ मिमिक्री करत नाही तर आपल्या भूमिकेत शिरतो. मग ती भूमिका गुत्थीची असो वा डॉ मशहूर गुलाटीची. तो कुठल्याही भूमिकेला न्याय देऊ शकतो, असे सलमान म्हणाला.