सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या जोडीचा तो फोटा बहिण अर्पिताने केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 12:15 PM
सलमान खान आणि कॅटरिना कैफ सध्या त्यांच्या आगमी चित्रपट टायगर जिंदा है मधील गाण्याच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या गाण्याच्या ...
सलमान खान आणि कॅटरिना कैफ सध्या त्यांच्या आगमी चित्रपट टायगर जिंदा है मधील गाण्याच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या गाण्याच्या शूटिंगसाठी सध्या दोघे ग्रीसमध्ये गेले आहे. नुकतेच त्यांच्या चित्रपटाचा पहिला पोस्टरदेखील रिलीज करण्यात आला होता. नुकताच कॅटरिना सलमानसोबतचा तिचा फोटो शेअर मीडियावर शेअर केला आहे. याला फोटोला खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. मात्र सलमानची बहिण अर्पिताने आपल्या कमेंटकडे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अर्पिताने हा फोटो शेअर करत म्हटले की मला ही जोडी खूप आवडते. अर्पिताने नुकतेच इन्स्टाग्रामवर सलमान आणि कॅटरिनाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत अर्पिताने लिहिले आहे, ''दोघे एकत्र खूप गोड दिसतात.'' सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ही कॅटरिना सलमानच्या कुटुंबीयांच्या जवळ आहे. आजही खानदानमध्ये प्रत्येक कार्यक्रमाच्यावेळी ती आवर्जून उपस्थित होते. नुकताच अर्पिता खानच्या घरी झालेल्या दिवाळी पार्टीत कॅटरिना कैफ दिसली होती. सलमान आणि कॅटरिनाचे ब्रेकअप झाल्यानंतर टायगर जिंदा है हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. तब्बल 5 वर्षनंतर दोघे एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. टायगर जिंदा हैच्या शूटिंग दरम्यान सलमान आणि कॅटरिना पुन्हा एकदा एकमेंकाच्या जवळ आल्याची चर्चा होती. याच कारणामुळे युलियाने टायगर जिंदा हैच्या शूटिंग दरम्यान आबु धाबीला येण्यासाठी हट्ट केला होता. मात्र सलमान तसे होऊन दिले नाही. कॅटरिना सलमानच्या आयुष्यात परतल्यामुळे सलमान आणि युलिया वंतूर यांच्यात दुरावा आल्याची ही चर्चा होती. गेल्या तीन वर्षांपासून युलिया सलमानच्या आयुष्यात आहे. सलमानच्या घरातल्या प्रत्येक फॅमिली फंक्शनमध्ये ती नेहमी हजर दिसायची. मात्र दिवाळी निमित्त सलमानची बहिण अर्पिता खान हिने दिलेल्या दिवाली पार्टीत युलिया दिसली नाही.टागगर जिंदा है या एक था टायगर चित्रपटाचा सीक्वल आहे. सलमान आणि कॅटरिनाचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट बघतायेत. ख्रिसमसमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ALSO READ : सन २०१९ची ‘ईद’ही ‘भाईजान’ सलमान खानच्या नावावर बुक! रिलीज होणार ‘हा’ चित्रपट!!