Join us  

बाबो! सलमान-रणबीरने ‘एक्स गर्लफ्रेन्ड’ कतरिनाला दिलं कोट्यावधीचं वेडिंग गिफ्ट; हृतिक, शाहरूखही नाहीत मागे !!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 12:48 PM

Vicky Kaushal Katrina Kaif Wedding : विकी व कॅटला लग्नात काय काय भेटवस्तू मिळाल्यात हे जाणून घेण्यास उत्सुक असाल तर एकदा वाचाच...

Vicky Kaushal Katrina Kaif Wedding : कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal )यांचं लग्न मोठ्या थाटामाटात  पार पडलं. पण या लग्नाच्या चर्चा अद्यापही थांबलेल्या नाहीत. लग्न सोहळ्याच्या फोटोंनी इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आता काय तर विकी व कॅटला लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंची चर्चा आहे. लग्नात या स्टार कपलला काय काय भेटवस्तू मिळाल्यात हे जाणून घेण्यास चाहतेही उत्सुक आहेत.

विकी व कतरिनाच्या लग्नात बॉलिवूड विश्वातील अगदी मोजके सेलिब्रिटी हजर होते. पण जे हजर नव्हते त्यांनीही या जोडप्याला एकापेक्षा एक महागड्या भेटवस्तू दिल्याचं कळतंय. अगदी सलमान खानपासून (Salman Khan ) रणबीर कपूरपर्यंत (Ranbir Kapoor) सर्वांनी कॅट व विकीला महागडं गिफ्ट दिलं आहे.

बॉलिवूडलाईफने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री कैफला तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याने तब्बल तीन कोटींची रेंज रोव्हर भेट केली आहे. भाईजान कॅटच्या लग्नाला हजर नव्हता. पण भेटवस्तू मात्र त्याने आठवणीनं दिली.विकीसोबत लग्न करण्याआधी कतरिना रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. एकेकाळी या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. पण आता तो भूतकाळ झाला आहे. कॅट आता मिसेस कौशल झाली आहे. रिपोर्टनुसार, रणबीरने कतरिनाला तिच्या लग्नात 2.7 कोटींचा एक हि-याचा हार भेट म्हणून दिला. रणबीरची सध्याची गर्लफ्रेन्ड आलिया भटही मागे नाही. तिने लाखो रूपयांचा परफ्युमचा एक सेट कतरिनाला गिफ्ट म्हणून दिल्याचे कळतेय.

शाहरूख खानने कतरिनाला लग्नाची भेट म्हणून एक खास पेन्टिंग पाठवल्याचं कळतंय. या पेंटिगची किंमत दीड लाख रूपये असल्याचं कळतंय. तर हृतिक रोशनने विकी व कॅटला BMW G310 R ही 3 लाखांची बाईक गिफ्ट दिल्याचं कळतंय.

अभिनेत्री तापसी पन्नूने विकीसोबत ‘मनमर्जिया’मध्ये काम केलं होतं. चर्चा खरी मानाल तर तापसीने विकीला एक प्लॅटिनम ब्रेसलेट भेट दिलं आहे. याची किंमत दीड लाखाच्या घरात आहे. या चर्चेत किती सत्यता आहे, ते आम्हाला ठाऊक नाही. पण या गिफ्टची सध्या जोरदार चर्चा आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कतरिना आणि विकीच्या लग्नाची चर्चा होती. अखेर हे दोघे 9 डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकले . दोघांनी राजस्थानमधील बरवाडा येथील हॉटेल सिक्स सेन्स फोर्ट येथे अगदी शाही थाटामाटात लग्न केलं. त्यांच्या लग्नासाठी जेवणापासून ते मेहंदीपर्यंत, कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत अनेक शाही थाट करण्यात आले होते.  

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशलसलमान खानरणबीर कपूरआलिया भट