सलमान खानच्या (Salman Khan) ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. याचवर्षी हा चित्रपट रिलीज होणार आहे. सलमानचा खासम् खास मित्र साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) हा या चित्रपटाचा को-प्रोड्यूसर आहे. सलमान व साजिद खूप जुने जिगरी यार. इतके की, दोघंही एकाच दिवशी लग्न करणार होते. पण... प्रत्यक्षात असं काहीही घडलं नाही. असं म्हणतात की, सलमानचं लग्न ठरलं होतं. अगदी लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या. पण लग्नाला आठवडा शिल्लक असताना अचानक सलमानने त्याचा निर्णय बदलला अन् लग्न करण्यास नकार दिला. मुळात असं काय झालं होतं? याचा खुलासा साजिदनं काही वर्षांआधी केला होता.2019 साली साजिद कपिल शर्मा शोमध्ये आला होता. यावेळी त्याने सलमानच्या लग्नाबद्दलचा हा खुलासा केला होता.
काय म्हणाला होता साजिद?
तो म्हणाला होता, ‘सलमानच्या आयुष्यात तेव्हा एक मुलगी होती. मला स्वत:च्या लग्नासाठी मुलगी शोधणं आवश्यक होतं. कारण सलमान व मी आम्ही दोघांनी एकाच दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मी माझ्या आईला आणि घरच्यांना माझ्यासाठी मुलगी शोधायला सांगितलं. सलमान आणि मी एकाच दिवशी लग्न करायचं ठरवलं असल्याचंही मी त्यांना सांगितलं होतं. सलमानचे वडील सलीम साहेब यांच्या वाढदिवशी अर्थात 18 नोव्हेंबरला आम्ही लग्न करणार होतो. मात्र लग्नाच्या ठीक 5-6 दिवस आधी सलमानने लग्नास नकार दिला. माझा मूड नाहीये, असं तो म्हणाला. त्याचा निर्णय बदलण्यात तो यशस्वी झाला. पुढे माझ्या लग्नाच्या वेळी तो माझ्या कानात कुजबुजला होता. बाहेर एक गाडी उभी आहे, तू सुद्धा तुझं मत बदल आणि पळून जा, असं तो माझ्या कानात हळूच म्हणाला होता.
साजिदने दिव्या भारती सीक्रेट लग्न केलं होत. यानंतर 2000 साली त्याने वर्धाशी लग्न केलं. सलमान मात्र आजपर्यंत बॅचलर आहे तो आहेच. सलमान संगीता बिजलानीशी लग्न करणार होता, असं म्हणतात. या लग्नाची सगळी तयारी झाली होती. पत्रिकाही छापून तयार होत्या. पण भीतीपोटी सलमानने या लग्नाला नकार दिल्याचं मानलं जातं.